‘मिलेट्सचे’ यश ही भारताची जबाबदारी

ग्लोबल मिलेट्स मध्ये पंतप्रधानांनी जारी केले भरड धान्यावर 'टपाल तिकीट आणि नाणे'

‘मिलेट्सचे’ यश ही भारताची जबाबदारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथे झालेल्या ग्लोबल मिलेट्स अर्थात भरड धान्य परिषदेचे उदघाटन केले. या परिषदेचे आयोजन भारतीय कृषी संशोधन केंद्राच्या दिल्लीस्थित कॅम्पस मध्ये करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२३ हे आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष असल्यामुळे टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण करण्यांत आले. या वेळेस पंतप्रधानांनी बायर सेलर मीट आणि प्रदर्शनाचे उदघाटन पण केले. संयुक्त राष्ट्राने २०२३ हे ‘भरड धान्य वर्ष’ भारताच्या प्रयत्नांनंतर घोषित केले आहे. ही परिषद भरड धान्याच्या बाबतीत एक मोठे पाऊल उचलत असून भारत या मोहिमेचे नेतृत्व करत आहे. असे पंतप्रधानांनी उदघाट्नच्या वेळेस म्हंटले आहे.

 

अशा घटना केवळ जागतिक कल्याणासाठी आवश्यक नाहीत तर भारत देशाने उचललेल्या मोठ्या जबाबदारीचे प्रतीक आहे. या परिषदेला १०० पेक्षा जास्त देशांमधील प्रतिनिधि आज उपस्थित आहेत. ही ग्लोबल मिलेट्स परिषद १९ मार्च पर्यंत चालणार आहे. पुढे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, भारत देशात अडीच कोटी शेतकरी बाजरीच्या शेतीशी निगडित आहेत. बाजरीच्या शेतीसाठी आमचे ध्येय या सर्व शेतकऱ्यांना आणि त्यांच्याशी संबंधित यंत्रणांना लाभदायक ठरेल. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था सुद्धा मजबूत होईल. आपल्या देशात बाजरीला आता श्रीअन्न अशी ओळख दिली गेली आहे.

श्रीअन्न हे फक्त शेतीपुरतेच आणि खाण्यासाठी मर्यादित राहिलेले नाही तर, भारताच्या सर्वागीण विकासाचे माध्यम बनत आहे. भारताने ‘श्री अन्न’ हे जागतिक पातळीवर आणण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. भारतामध्ये १२ ते १३ राज्यांमध्ये मिलेट्सची लागवड केली जाते. आत्तापर्यंत याचा घरगुती वापर कमी होता तरी, पण आता याचा वापर घराघरात वाढला असल्याचे दिसत आहे. जे एका महिन्यात दोन ते तीन किलो मिलेट्स खात असत तेच आता त्यांनी १४ किलोपर्यंत भरड धान्य वापरायला सुरवात केली आहे. पंतप्रधानांनी याविषयी बोलताना पुढे सांगितले कि, मला मिलेट्सच्या आणखी एका गुणधर्माची व्याप्ती सांगायची आहे.

हे ही वाचा:

गोव्यातून औषाधांच्या नावाखाली बिअर आणि विदेशी दारू जप्त

अखेर लाल वादळ शमलं, शेतकरी मोर्चा स्थगित

वरुण गांधींकडून काही तरी शिका राहुल गांधी!

वडिलांनी चुकीच्या परीक्षा केंद्रावर सोडलेल्या मुलीसाठी गुजरात पोलीस आले धावून

मिलेट्सची ताकद म्हणजे त्याला लागवडीसाठी लागणारे हवामान. हे खराब हवामानात सुद्धा अगदी सहज वाढते. याच्या उत्पादनांसाठी अत्यंत कमी पाण्याची आवश्यकता लागते. म्हणून पाण्याच्या अभाव असला तरी हे पीक चांगले येऊ शकते. मिलेट्स हे ग्लोबल नॉर्थच्या अन्न समस्येचे आणि शेतीसाठीचा उत्तम समाधान असल्याचे बोलले जाते. मिलेट्स पिकवायला खर्चही कमी येतो आणि आणि इतर पिकांच्या तुलनेत ते उगवते सुद्धा लवकर त्यामुळे ते चवदार आणि पौष्टिक सुद्धा आहे. दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिह तोमर यांनी मिलेट्स संदर्भात कोणताही प्रश्न आला तेव्हा पंतप्रधानांनी उत्तम मार्गदर्शन केल्याचे म्हण्टले आहे.

Exit mobile version