हमासच्या नरसंहारातून बचावलेल्या विद्यार्थ्यांनी कथन केला प्रसंग

हमासच्या नरसंहारातून बचावलेल्या विद्यार्थ्यांनी कथन केला प्रसंग

इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या नरसंहारातून वाचलेल्या लोकांनी सोमवारी हायफा विद्यापीठाच्या इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन आपल्यावर घडलेला प्रसंग कथन केला. तेव्हा तिथे उपस्थित सगळेच हादरून गेले. घाना, कॅमरून, जर्मनी, अमेरिका, व्हेनेझुएला, म्यानमार आणि चीनसारख्या देशांतून हायफा विद्यापीठाच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या २० विद्यार्थ्यांनी हमासच्या नरसंहारातून बचावलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

होंडुरास येथे राहणारी जीना रिहाना हिने सांगितले की, तुम्ही कल्पनाही नाही करू शकत की, माझ्या वयाच्या लोकांना कोणत्या नरकयातनेतून जावे लागले. मी कधीच या भयानक घटनेला विसरू शकत नाही. गाझा पट्टीनजीक असलेल्या किबुत्झ रीमच्या मैदानात संपूर्ण रात्रभर चाललेल्या सुपरनोव्हा सुक्कोट संगीत सोहळ्यात तीन हजार नागरिक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची सोशल मीडियावर खूप प्रसिद्धी करण्यात आली होती. त्यामुळे हमासचे लक्ष याकडे केंद्रित झाले.

हे ही वाचा:

व्यक्तीच्या मृत्यूनंतर नऊ महिन्यांनी त्याचं व्यक्तीच्या मृत्यूच्या शिक्षेवर पाकिस्तानात होणार सुनावणी

अफगाण खेळाडूंना इरफान पठाणचा खास पाहुणचार!

जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!

भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त

या संगीत सोहळ्यात सुमारे २६० जण मारले गेले. तर, कित्येकांना कैद करून गाझामध्ये आणण्यात आले. ‘हे विद्यार्थी आमच्याकडून नेमके काय झाले हे जाणून घेण्यास उत्सुक होते. त्यांना सत्य परिस्थिती माहीत करून हवी होती, जेणेकरून ते ती इतरांना सांगतील,’ असे रेहोवटोमधील २३ वर्षीय तामीरने सांगितले. म्यानमारची एक विद्यार्थिनी सांग लाट-जा हिने सांगितले की, तिला वाटले ती इस्रायलची परिस्थिती समजून घेऊ शकते. कारण तिच्या मातृभूमीतही युद्ध सुरू असते. मात्र हमासचे अत्याचार जाणून घेतल्यावर तिला कळून चुकले की, इस्रायलचा संघर्ष म्यानमारच्या संघर्षापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे.

Exit mobile version