29 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरदेश दुनियाशाळकरी मुलंही तालिबानींविरोधात एकवटली

शाळकरी मुलंही तालिबानींविरोधात एकवटली

Google News Follow

Related

तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तेथील महिलांच्या स्वातंत्र्यावर बंधनं आली आहेत. तालिबान्यांनी राजकारणापासून ते अगदी शाळांपर्यंत महिला आणि मुलींसाठी नव्याने आदेश काढले आहेत. जवळजवळ महिन्याभरानंतर अफगाणिस्तानमधील शाळा मुलांसाठी सुरू झाल्या आहेत. मात्र मुलींसाठी शाळा कधी सुरू होतील याची अधिकृत माहिती अजूनही देण्यात आलेली नाही. तालिबान्यांनी शाळकरी मुलींना शाळेत उपस्थित राहण्यास बंदी घातली आहे. मात्र, आता या निर्णयाविरोधात तेथील शाळकरी मुलांनी भूमिका घेतली आहे. एकजूट दर्शवण्यासाठी काही शाळकरी मुलांनीदेखील शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

द वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानातील काही शाळकरी मुलांनी तालिबान्यांविरुद्ध भूमिका घेतली आहे. जोपर्यंत मुलींसाठी शाळेचे दरवाजे उघडले जात नाहीत तोपर्यंत आपणही शाळेत जाणार नाही, अशी भूमिका काही मुलांनी घेतली आहे. ‘महिलांमुळे समाज पूर्ण होतो. जोपर्यंत मुलींसाठीही शाळा उघडल्या जात नाहीत, तोवर मीदेखील शाळेत जाणार नाही,’ असे मत बारावीत शिकणाऱ्या १८ वर्षीय रोहुल्लाहने मांडले आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेने जीव वाचवून पळ काढला

काँग्रेस शासित राजस्थानमध्ये हिंदू मुलाचे ‘लिंचिंग’

दहशतवादी रिजवान मोमीनला मुंब्र्यातून अटक

कधी काळी थाटला होता संसार, आता बिग बॉसच्या घरात एकत्र

‘मुलींनी शिक्षण घेतल्यावर पिढ्या घडत असतात. मुलाच्या शिक्षणाचा कदाचित फक्त कुटुंबाला फरक पडतो. मात्र, मुलीच्या शिक्षणाचा परिणाम समाजावर होतो,’ असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. मुलींना शिक्षण मिळावे आणि त्यांनी ते पूर्ण करावे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सत्तापालट झाल्यावर महिलांना सर्व अधिकार देण्यात येतील असे आश्वासन देणाऱ्या तालिबान्यांनी हळूहळू आपले रंग दाखवायला सुरुवात केली आणि महिलांवर बंधने लादण्यास सुरुवात केली. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने शाळांना फक्त मुले आणि पुरुष शिक्षकांसाठी सुरु करण्याची परवानगी दिली आहे. शिक्षण मंत्रालयाकडून शाळा सुरु करण्याची घोषणा करताना कुठेही मुलींचा उल्लेख नव्हता. संयुक्त राष्ट्रानेही मुलींचं शिक्षण आणि त्यांच्या भविष्यासंबंधी चिंता व्यक्त केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा