तुर्कस्तानमधील विध्वंसानंतर, आता भारताच्या या राज्यात भूकंप, जाणून घ्या तीव्रता

तुर्कस्तानमधील विध्वंसानंतर, आता भारताच्या या राज्यात भूकंप, जाणून घ्या तीव्रता

तुर्कस्तान – सीरियातील भूकंपाने केलेल्या महाविध्वंसानंतर आता भारतात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सिक्कीमच्या काही भागात सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत .राष्ट्रीय भूकंप केंद्राच्या माहितीनुसार, पहाटे ४.१५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सिक्कीममधील युकसोमपासून ७० किमी ईशान्येला भूकंप झाला. म्हुकंपामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे सध्या वृत्त नाही. सध्या देशातील अनेक राज्यात भूकंपाचे सौम्य झटके जाणवत आहेत.

गेल्या रविवारी आसामच्या काही भागातही चार तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. राष्ट्रीय भूकंप केंद्राच्या अहवालानुसार दुपारी ४.१८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचा केंद्रबिंदू नागाव जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिण तीरावर होता. भूकंपाचा केंद्रबिंदू भूपृष्ठापासून १० किलोमीटर खोलीवर होता.

पश्चिम कार्बी आंगलाँग, कार्बी आंगलांग, गोलाघाट आणि मोरी गावातील लोकांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तरेकडील सोनितपूरमध्ये राहणाऱ्या लोकांनाही हा धक्का बसला. ईशान्येकडील सर्व राज्ये उच्च भूकंप प्रवण क्षेत्रात येतात आणि या भागात भूकंपाचे धक्के नियमितपणे जाणवतात.

हे ही वाचा:

रेल्वेच्या ओव्हरहेड व्हॅनने आपल्याच ४ कर्मचाऱ्यांना चिरडले

लोकसभा सचिवालयाची राहुल गांधी यांना हक्कभंगाची नोटीस

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चावीमुळे बंजारा समाज विकासाच्या मार्गावर

महापालिकेसाठी भाजप मिशन १५० घोषित

भारतातील सुमारे ५९ टक्के जमीन वेगवेगळ्या तीव्रतेच्या भूकंपांसाठी संवेदनशील आहे. ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील शहरे आणि गावे झोन-५ मध्ये आहेत आणि त्यांना सर्वाधिक तीव्रतेच्या भूकंपाचा धोका आहे. झोन-५ मध्ये ९ तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो. झोन-५ मध्ये गुजरात, हिमाचल प्रदेश, बिहार, जम्मू आणि काश्मीर आणि संपूर्ण ईशान्येचा समावेश आहे.

Exit mobile version