रविवारी तैवानच्या भूमीला शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, येथे ६.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की एक दुमजली इमारत कोसळली आणि एका ठिकाणी ट्रेन रुळावरून घसरली.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के शहराच्या उत्तरेला ५० किलोमीटर अंतरावर (स्थानिक वेळेनुसार) जाणवले. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू १० किमी खाली होता. दोन मजली इमारत कोसळल्यानंतर दोन जखमींना वाचवण्यात आल्याचे सांगण्यात आले. भूकंपाच्या धक्क्यांनंतर एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये लोक आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीतून बाहेर पडताना दिसत आहेत.
भूकंपाचे केंद्र तैतुंग काउंटीमध्ये होते आणि त्याच भागात ६.९ तीव्रतेचा भूकंप आला, ज्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणाने भूकंपाची तीव्रता ७.२ आणि १० किमी (६.२ मैल) खोल मोजली आहे . युलीमध्ये एक कमी उंचीची इमारत कोसळली आणि आतील चार लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आल्याचं तैवानमधील माध्यमांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा:
दसरा मेळाव्यासाठी शिंदेंचा अर्ज स्वीकारला, ठाकरेंचा अर्ज फेटाळला
अमित शहांच्या ताफ्यासमोर टीआरएस नेत्याने गाडी केली पार्क
७० वर्षानंतर चित्ते आले भारतात, पंतप्रधान मोदींनी काढले फोटो
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
जपानमध्ये सुनामीचा इशारा
जपानच्या हवामान खात्याने सुनामीचा इशारा जारी केला आहे. येथे नागरिकांना अंधार पडण्यापूर्वी दक्षिणेकडील क्युशू बेट रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. रविवारी येथे जोरदार वादळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे २० इंचापर्यंत पाऊस पडू शकतो. तैवानशी संबंधित बेटावर सुनामीचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.