युक्रेनची लष्करी मदत थांबवणे म्हणजे पुतीन यांची मदत करणे

ट्रम्प यांच्या निर्णयावर युक्रेनच्या संसदीय परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया

युक्रेनची लष्करी मदत थांबवणे म्हणजे पुतीन यांची मदत करणे

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चेदरम्यान शाब्दिक चकमक झाली आणि आता याचे परिणाम दोन्ही देशांच्या संबंधांवर दिसून येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेत युक्रेनला देण्यात येणारी लष्करी मदत थांबवली आहे. यामुळे आता रशियाविरोधात युद्धाला मैदानात उतरलेल्या युक्रेनचा टिकाव कसा लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाचं ट्रम्प यांच्या निर्णयावर युक्रेन कडून प्रतिक्रिया आली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला दिलेली सर्व लष्करी मदत थांबवल्याने ते रशियाच्या अटींवर कीवला आत्मसमर्पण करण्यासाठी ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत, असे युक्रेनच्या संसदीय परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. “आता लष्करी मदत थांबवणे म्हणजे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिनला मदत करणे,” असे युक्रेनच्या संसदीय परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष ओलेक्झांडर मेरेझको यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, हे सर्व वाईट दिसते. असे दिसते की ते आपल्याला शरणागती पत्करण्याकडे; म्हणजेच रशियाच्या मागण्या स्वीकारण्याकडे ढकलत आहेत.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये चर्चेदरम्यान बाचाबाची झाली. जगभरात या घटनेची चर्चा झाली. या वादानंतर झेलेन्स्की चर्चा सोडून निघून गेले तर ट्रम्प यांनीही शांततेच्या मुद्द्यावर बोलायचे असल्यास चर्चेला येऊ शकता असं म्हटलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनसाठी अमेरिकेच्या मदतीला विराम देण्याचे निर्देश दिले असून ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर रशियासोबत शांतता चर्चेत सहभागी होण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे ही वाचा:

देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी होताच अबू आझमी वरमले; वक्तव्य घेतले मागे

उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार पान खाऊन थुंकला, अध्यक्षांनी दिली समज

भोपाळमध्ये महापुरुषांच्या नावाने प्रवेशद्वार उभारणार

मोबाईल चोरीच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत मृत्यू

माहितीनुसार, युक्रेनचे नेते शांतता वाटाघाटींसाठी वचनबद्धता दाखवत नाहीत तोपर्यंत लष्करी मदत रोखली जाईल. ही मदत कायमची बंद केलेली नसून हा एक विराम असणार आहे. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात झालेल्या बाचाबाचीनंतर हा निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाच्या विरामामुळे युक्रेनला होणारी निर्यात थांबली आहे, ज्यामध्ये टँकविरोधी शस्त्रे, हजारो तोफखाना आणि रॉकेट यासारख्या महत्त्वाच्या शस्त्रसामग्रीचा समावेश आहे.

भेगांची भगदाडे होणार नाहीत... | Dinesh Kanji | Mahayuti | Mahavikas Aghadi | Devendra Fadnavis |

Exit mobile version