27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरदेश दुनिया‘रावण लीलां’ना आवर घाला...

‘रावण लीलां’ना आवर घाला…

Google News Follow

Related

श्रीरामभक्तांचा अपमान करणाऱ्या चित्रपटातील संवाद, नाव, संदर्भ काढून टाकण्यासाठी नोटीस

‘रावण लीला’ या हिंदी चित्रपटात श्रीरामभक्तांच्या भावनांचा अपमान करणारे संवाद आणि तथ्यांची केलेली चिरफाड याला आक्षेप घेत अंबरनाथचे रहिवासी कमलेश गुप्ता यांनी सदर चित्रपटाच्या दिग्दर्शकासह इतरांना नोटीस बजावली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक हार्दिक गज्जर, निर्माते धवल गाडा, अक्षय गाडा, पार्थ गज्जर, रिचा सचन, हार्दिक गज्जर फिल्म्स, बॅकबेंचर पिक्चर्स, पेन मूव्हिज, संवादलेखक श्रेयस लव्हलेकर, अभिनेता प्रतीक गांधी आदिंना ही नोटीस पाठविण्यात आली आहे.

याचिकादाराच्या वतीने ऍड. प्रकाश साळसिंगीकर यांनी ही नोटीस बजावली आहे.

या नोटिशीत म्हटले आहे की, या चित्रपटाची जी टॅगलाइन, राम मे क्यो तुने रावण को देखा अशी आहे. या चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यानंतर माझ्या अशीलाला मानसिक त्रास झाला. रावण हा वाईट प्रवृत्तीचे प्रतीक आहे. तर श्रीराम हे हिंदूंचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे ही टॅगलाइन माझ्या अशीलाला अस्वस्थ करणारी आहे.

९ सप्टेंबरला या चित्रपटाचा ट्रेलरही दाखविण्यात आला. त्यातील १ मिनिट ५२ सेकंद या वेळेदरम्यान या चित्रपटातील अभिनेत्यांचा रावण आणि राम या पात्रांच्या रूपात संवाद आहे. तो संवाद असा आहे-

रावण : आपने मेरे बहन का अनादर किया, तो हमने आपके स्री का अनादर किया…आप की तरह नाक नही काटी…फिर भी लंका हमारी जली…भाई और बेटे हमारे शहीद हुए…सारी परीक्षाये हमने दी…और जयजयकार आपकी क्यूँ?

राम :  क्यू की हम भगवान है

 

या संवादासंदर्भात माझ्या अशीलाचे म्हणणे आहे की, या संवादातून असा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न होतो आहे की, मी देव आहे म्हणून मी काहीही करू शकतो. हा काढण्यात आलेला अर्थ पूर्णपणे चुकीचा आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून वास्तवाची चिरफाड करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. किंबहुना, रावणाला योग्य ठरवून हिंदू धर्मियांच्या भावनांचा अनादर करण्याचा हेतू आहे.

या नोटिशीत नमूद केले आहे की, सगळ्यांना ठाऊक आहे की, लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखाचे नाक तिने सीतेला मारण्याचा प्रयत्न केला म्हणून कापले. राम आणि लक्ष्मणाने रावणाच्या बहिणीचे त्यासाठी अपहरण केले नाही. पण या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्यांनी जाणीवपूर्वक श्रीरामाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या अशीलाचे हेही म्हणणे आहे की, या चित्रपटाच्या माध्यमातून रावणाचे प्रतिमासंवर्धन करतानाच श्रीरामावर श्रद्धा असणाऱ्या कोट्यवधी रामभक्तांचा अपमान केला आहे. या चित्रपटात राम आणि रावण यांची तुलना करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

माझ्या अशीलाचे असेही म्हणणे आहे की, या चित्रपटाचे नावही आक्षेपार्ह आहे. वाईटावर चांगल्याचा विजय हे राम लीलेचे सार आहे. राम लीलेनुसार नवरात्रीनंतर दहाव्या दिवशी रावणाचा नाश केला जातो. त्यासाठी रावणाची प्रतिमा जाळली जाते. या चित्रपटाच्या नावातून लोकांच्या मनात राम लीलेविषयी संदेह निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते, लेखक, चित्रपट निर्माण करणारी कंपनी यांनी स्वस्त प्रसिद्धीसाठी श्रीरामाची प्रतिमा डागाळली आहे.

हे ही वाचा:

‘या’ लोकसभा खासदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल

सहा जिल्ह्यांच्या पोटनिवडणुकांना मिळाला मुहूर्त; ५ ऑक्टोबरला मतदान

नामांकित लेखकांच्या पुस्तकांचे ते करत होते बेकायदेशीर ‘पीडीएफ’

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जमिनीवरच अनधिकृत बांधकामे

म्हणूनच येत्या तीन दिवसांत सदर संवाद किंवा लोकभावनांचा अनादर करणारे सगळे संवाद या चित्रपटातून काढून टाकावेत, चित्रपटाची टॅगलाइन वगळावी, चित्रपटाचे नाव बदलावे. तसे न झाल्यास आपल्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे स्वातंत्र्य माझ्या अशीलाला असेल. बदनामीचा खटला तुमच्यावर दाखल केला जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमचीच असेल, असा इशाराही गुप्ता यांनी या नोटिशीद्वारे दिला आहे.

या नोटिशीची प्रत अंबरनाथ पोलिस स्टेशन, ठाणे पोलिस आयुक्त, सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशनला पाठविण्यात आली आहे.

 

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा