देशामध्ये ख्रिश्चन मिशनरी आणि मुस्लिम मौलवी यांच्याद्वारे चालणाऱ्या अवैध धर्मांतरणाला आळा घालण्याच्या दृष्टीनी केंद्रीय कायदा बनवण्याची अत्यावशकता आहे, ह्या मागणीसाठी विश्व हिन्दू परिषदेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
धर्मांतरणाच्या विषयामध्ये अभ्यास करण्याच्या दृष्टीने नियोगी आयोग तथा वेणुगोपाल आयोग गठीत केला गेला होता, त्या आयोगांच्या मताप्रमाणे पण असा कायदा बनण्याची आवश्यकता नमूद केली गेली आहे. सरला मुदगिल प्रकरणामध्ये तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने ह्या विषयी स्पष्ट निर्देश दिले होते.
अशा धर्मांतरणामुळे भारताच्या जनसांख्यकीय स्वरूप आणि अस्मिता धोक्यात आली आहे. ह्या विषयाला अनुसरून अनेक आपराधिक प्रकारची षड़यंत्रे निदर्शनास येत आहेत. मूकबधिर मुलांचे धर्मांतरण करून त्यांचे मानवी बॉम्ब ह्या स्वरूपात वापर करण्याची शंका व्यक्त केली जात आहे. लव्हजिहादच्या प्रकरणांमध्ये हिन्दू मुलींचे शोषण करून नंतर हत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
ह्या विषयाची गंभीरता लक्षात घेता, गेल्या काही वर्षांमध्ये अकरा राज्यांमध्ये धर्मांतरणाविरुद्ध अधिनियम बनवले गेले आहेत. परंतु ह्या राष्ट्रव्यापी षड्यंत्राची दाहकता लक्षात घेता, ह्या अवैध धर्मांतरणास पूर्णपणे रोखण्यासाठी केंद्रीय कायदा बनवण्याची आवश्यकता आहे.
सध्या केंद्रात असणाऱ्या सरकारने राष्ट्रीय महत्वाच्या अनेक विषयांवर पावले उचलून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ह्या विषयावर पण हे केंद्र सरकार अशीच त्वरित कार्यवाही करेल असा आम्हाला विश्वास आहे, असे मत ह्या शिष्टमंडळाने व्यक्त केले.
हा कायदा बनवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारला जे निवेदन आम्ही देत आहोत त्यात आपण विशेष लक्ष घालून योग्य ती कार्यवाही त्वरित व्हावी या दृष्टींनी शिफारस करावी, अशी विनंती ह्या शिष्टमंडळाने राज्यपालांना केली.
हे ही वाचा:
खासगी इलेक्ट्रिक बसेसचा बसणार एसटीला शॉक
कौतुकास्पद! लसीकरण १ अब्जच्या दिशेने
अमली पदार्थविरोधी कक्षाला आढळली मानखुर्द, गोवंडी ‘नशेत’
गणेश मिरवणुकांना बंदी; ईदच्या मिरवणुकांना हिरवा कंदिल
ह्या शिष्टमंडळात विश्व हिन्दू परिषदेचे संजय ढवळीकर, क्षेत्र संपर्क प्रमुख, शंकर गायकर – क्षेत्र मंत्री, ऍड जोगसिंग – प्रांत अध्यक्ष, रामचंद्र रामूका – प्रांत मंत्री कोंकण, गोविंद शेंडे – प्रांत मंत्री विदर्भ, ललित चौधरी – प्रांत मंत्री देवगिरी हे उपस्थित होते.