‘वंदे भारत’ या गाडीवर गेल्या काही दिवसात अनेकवेळा दगडफेक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याबाबत कारवायाही केल्या आहेत, पण अद्याप अशा घटना घडतच आहेत. आता म्हैसूर चेन्नई वंदे भारत एक्सप्रेसवरही दगडफेक करण्यात आली आहे. म्हैसूर चेन्नई हि वंदे भारत एक्सप्रेस केआरपुरंम रेल्वे स्थानकातून बंगळूर छावणीकडे जात होती त्यावेळेस हा प्रकार समोर आला आहे. दक्षिण भारतातील पहिली वंदे भारत रेल्वे शनिवारी रात्री २५ फेब्रुवारी रोजी साडेदहाच्या सुमारास बंगळूर छावणी स्थानकाकडे जाताना हा अनुचित प्रकार घडला आहे. या हल्ल्याच्या दरम्यान या रेल्वे गाडीच्या सहा काचा फोडण्यात आल्या असून दक्षिण पश्चिम रेल्वेने रवीवारपासूनच ज्या भागात हि घटना घडली त्या भागात आता गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची पाहणी पण चालू आहे.
दक्षिण-पश्चिम रेल्वे च्या अधिकाऱ्याने देण्यात आलेल्या माहितीनुसार, हि घटना घडली तेव्हा ताशी सुमारे ९० किलोमीटर प्रति तास वेगाने धावत होती. याचदरम्यान अचानक खिडकीच्या काचांवर दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये खिडक्यांच्या सहा काचा फुटल्याचे वृत्त समोर आले आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेने माहिती दिली की, हि खूप गंभीर बाब आहे. आणि यासाठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. म्हणूनच या भागात गस्त वाढवण्यात येत आहे आणि गरज पडल्यास यासाठी आम्ही स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना यांत सहभागी करून घेऊन त्यांची मदत घेत आहोत.
हे ही वाचा:
अजितदादांना असे आरोप शोभतात का?
आपत्तीग्रस्तांच्या मदत निधीत भरीव वाढ..जाणून घ्या किती
सरकारी योजनांच्या लाभार्थींची ठेवणार अनोखी ‘आठवण’
अजितदादा, ही पोटदुखी कशामुळे? शिंदे-फडणवीसांनी विचारला सवाल
या प्रकरणाचा तपास सुरु आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्यानंतर या एक्सप्रेसवरती दगडफेक होण्याची हि दुसरी घटना आहे. जानेवारी मध्ये झालेल्या पहिल्या घटनेत रेल्वे पोलिसांनी कोणतीही हानी न झाल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. या घटनेमध्ये झोपड्पट्टीवासी आणि काही महाविद्यालयीन मुले संशयाच्या फेऱ्यात आले आहेत. पण शनिवारच्या घटनेमध्ये कोणाचा हात होता हे अद्याप समजू शकले नाही. अलीकडच्या काळांत दगडफेकीच्या घटना वाढल्या असल्याचे दक्षिण पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आरपीएफ अर्थात रेल्वे संरक्षण दलाने दक्षिण पश्चिम रेल्वेच्या बेंगळूर विभागांत जानेवारी २०२३ मध्ये दगडफेकीची एकूण २१ आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये एकूण १३ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कलम १५२, १५४ आणि कलम १४७ अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर या घटनास्थळी आणि आजूबाजूच्या शाळा , खेडी वगैरे ठिकाणी आरपीएफ द्वारे जागरूकता मोहीम राबवल्या जात आहेत. ज्यामुळे रेल्वेचे नुकसान न करणारे आणि ट्रेन ऑपेरेशनची सुरक्षा धोक्यात न आणण्यासाठी उपाय केले जातील.