इराणमध्ये हिजाबविरोधातील आंदोलन पेटलेलेच; गोळीबारात दोन महिला मृत्युमुखी

हिजाबविरोधी आंदोलकांनी एका मदरशालाही आग लावली

इराणमध्ये हिजाबविरोधातील आंदोलन पेटलेलेच; गोळीबारात दोन महिला मृत्युमुखी

इराणमध्ये हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही. दोन शहरांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनांमध्ये सात जण ठार झाले. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. काही सुरक्षा कर्मचाऱ्यांसह दहा जण जखमी झाले आहेत. इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलकांनी एका मदरशालाही आग लावली.

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलने तीव्र होत असताना हिंसाचाराच्या घटनाही वाढत आहेत. इराणच्या नैऋत्य प्रांत खुजेस्तानमधील एजेह शहरातील बाजारपेठेत काही बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे चेंगराचेंगरी झाली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. येथे काही सुरक्षा कर्मचाऱ्यांसह दहा जण जखमी झाले.
त्यामुळे अनेकांना अटक करण्यात आली होती.

हे ही वाचा:

रणजित सावरकर राहुल गांधींविरोधात तक्रार करणार

गॅस सिलिंडर चोरीविरोधात सरकारचा आता ‘कोड’वर्ड

‘राहुल गांधी हा मनोरुग्ण, सावरकर समजण्याइतकी अक्कल या माणसामध्ये नाही’

धारावीत बाळासाहेब ठाकरे दवाखाना

 

दरम्यान हिजाबविरोधी आंदोलनेही तीव्र होत आहेत. १७ सप्टेंबर रोजी पोलीस कोठडीत २२ वर्षीय विद्यार्थिनी महसा अमिनीचा मृत्यू झाल्यापासून इराणमध्ये निदर्शने सुरू आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून देशात सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये किमान ३४४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर १५,८२० लोकांना अटक करण्यात आली आहे.

हिजाबविरोधी निदर्शने रोखण्यासाठी इराणी सैन्याने केलेल्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.या चळवळीचे नेतृत्व मुली करत आहेत. देशभरात ठिकठिकाणी आंदोलकांचे गट एकत्र येत आहेत आणि सरकारविरोधी घोषणा देत आहेत. इजेहमध्ये अनेक ठिकाणी या लोकांनी पोलिसांवर दगडफेकही केली. ना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

Exit mobile version