जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत बुधवारी लष्कराचे कर्नल, मेजर आणि जम्मू काश्मीरचे पोलिस उपअधीक्षक शहीद झाले. या घटनेमुळे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये अजूनही दहशतवाद्यांचे तळ कायम आहेत, याला दुजोरा मिळाल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
घुसखोरांवर नियंत्रण, गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा दलांमधील उत्कृष्ट समन्वयामुळे गेल्या काही वर्षांत जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या हिंसाचारात लक्षणीय घट झाली आहे. मात्र याचा अर्थ असा नव्हे की, जम्मू आणि काश्मीरमधील युद्धसम परिस्थितीला चालना देण्यासाठी पाकिस्तानच्या रणनितीत बदल झाला आहे. सीमेपलीकडील दहशवाद्यांचे तळ अजूनही कायम आहेत. येथे प्रशिक्षण शिबिरे अजूनही कार्यरत आहेत. पाकचे लष्कर आणि आयएसआयसारखी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, अल बद्र आणि अन्य दहशतवादी संघटनांना सक्रिय मदत आहे,’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा:
बॉलीवूडमधील सेलिब्रेटी ईडीच्या रडारवर
लिबियात हाहाःकार, महापुरामुळे २० हजार मृत्यू
मुंबई विमानतळावर खासगी विमान कोसळले
कुलाब्याच्या हॉटेल बडेमियाँच्या किचनमध्ये झुरळे, उंदीर
लष्कराने नियंत्रण रेषेपलीकडील घुसखोरीचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात उधळले आहेत. ‘दहशतवादी आता पंजाब आणि नेपाळमधूनही घुसखोरी करत आहेत,’ असे उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले. ‘जम्मू आणि काश्मीरमधील शांतता बिघडवण्यासाठी पाकिस्तान दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्याच्या जुन्या कुरापती काढत आहे,’ असे द्विवेदी यांनी सांगितले.
विशेषत: पीर पंजाल पर्वतरांगांच्या दक्षिणेकडील भागात दहशतवाद पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. ‘गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सीमेवर १५० हून अधिक प्रशिक्षित दहशतवाद्यांना आश्रय देण्यात आला आहे,’ असे अधिकाऱ्याने सांगितले. लष्कर-ए-तोयबाची संघटना असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनचक आणि डीएसपी हुमायून भट यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.