अबब….सूर्यापेक्षा दहापट मोठा तारा फुटला !

अबब….सूर्यापेक्षा दहापट मोठा तारा फुटला !

महाकाय ताऱ्यांचा खोल अंतराळात नाश होत असल्याबद्दल आपण अनेकदा ऐकले आणि वाचले आहे. ते कश्या प्रकारचे दृश्य असेल याची कधी कल्पना केली आहे? पृथ्वीच्या जवळून तारा कसा दिसेल? याची उत्तरे आपल्याकडे कधीच नव्हती. मात्र, आता या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाली आहेत.

खगोलशास्त्रांनी प्रथमच जमिनीवर आधारित दुर्बिणीचा वापर करून एका विशाल लाल तार्‍याचा स्फोट होऊन त्याचा नाश होताना पहिले आहे. खगोलशास्त्रांनी NGC 5731 आकाशगंगेत पृथ्वीपासून १२० दशलक्ष प्रकाश-वर्षे दूर असलेला लाल तारा याचा थेट नाश होताना पहिला. आणि तो तारा सुपरनोव्हामध्ये कोसळला.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, स्फोट होण्यापूर्वी हा तारा सूर्यापेक्षा दहा पट जास्त मोठा होता. त्याच्या गाभ्यातील हायड्रोजन, हेलियम आणि इतर घटक जळल्यानंतर त्याचा उद्रेक झाला. ताऱ्याच्या नाशाबद्दल तपशील देणारे हे वृत्त गुरुवारी द अँस्ट्रोफिजिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाले.

या अभ्यासाचे प्रमुख लेखक विन जेकबसन-गॅलन म्हणाले की, महाकाय ताऱ्यांचा नाश होण्याआधी काय घडते याचा अभ्यास आणि हे थेट पाहणे ही एक आपली मोठी प्रगती आहे. प्रथमच आम्ही लाल तारा फुटताना पहिला.

हे ही वाचा:

बीएमडब्ल्यूचा रंग माझा वेगवेगळा!

आम आदमी पक्षाचे मत फुटले! चंदीगड महापालिकेत मुख्य उपमहपौरही भाजपाचाच

नागालँडमध्ये आढळला वेगळाच बिबट्या

मोदी अडथळा बनलेत…

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, ताऱ्यांचा स्फोट होण्यापूर्वीच्या क्रियेचा खगोलशास्त्रज्ञांनी १३० दिवस आधी अभ्यास केला होता. हवाई विद्यापीठाच्या खगोलशास्त्र संस्थेच्या पॅन-स्टार्स दुर्बिणीने २०२० च्या उन्हाळ्यात तेजस्वी किरणोत्सर्ग याचा शोध लावला होता. त्याच वर्षी, संशोधकांनी त्याच ठिकाणी एक सुपरनोव्हा पाहिला.

किरणोत्सर्ग बाहेर फेकणार्‍या तार्‍यांचा शोध घेण्यासाठी आणि ते त्या तार्‍याच्या निकटवर्ती मृत्यूचे संकेत देत आहेत की नाही हे पाहण्यासाठी, तसेच ताऱ्यांचा जन्म, जीवन आणि मृत्यू या सर्वाचा अभ्यास करणे हे खगोलशास्त्रज्ञांचे उद्दिष्ट आहे.

Exit mobile version