आयसीसी मेन्स टी-२० विश्वचषक येत्या रविवार पासून म्हणजेच १७ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. या विश्वचषकाची उत्सुकता जगभर पाहायला मिळत आहे. याच निमित्ताने स्टार स्पोर्ट्सने एक नवीन जाहिरात प्रदर्शित केली आहे. ही जाहिरात सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. ‘मौका मौका’ या आपल्या जुन्याच थीमवर बेतलेली नवीन जाहिरात स्टार स्पोर्ट्स घेऊन आला आहे. या जाहिरात प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे.
रविवार, २४ ऑक्टोबर रोजी टी-२० विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. क्रिकेटच्या मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना कायमच सर्वाधिक प्रेक्षक पसंती लाभणार सामना मानला जातो. पण आजवर विश्वचषकांचा इतिहास पहिला तर पाकिस्तान एकदाही भारताला पराभूत करू शकलेला नाही.
हे ही वाचा:
IPL 2021: अंतिम फेरीत चेन्नईला कोलकाता भिडणार
बळी राजाची पुन्हा निराशाच! ठाकरे सरकारकडून पुरेशी मदत नाहीच
राजस्थानमधील काँग्रेसचे मंत्री म्हणाले, महिला कर्मचारी म्हणजे डोकेदुखी!
मोदी सरकारच्या योजना मानवाधिकारांचं जतन करणाऱ्या
टी-२० विश्वचषकातही भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा एक वेगळा इतिहास आहे. पहिल्या टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ अंतिम फेरी खेळले असून त्यात भारत विजयी झाला होता. तर त्या आधी साखळी सामन्यांत भारत आणि पाकिस्तन यांचा सामना टाय होऊन ‘बॉल आउट’ पद्धतीने या सामन्याचा निकाल लागला होता ज्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती. भारताने आत्तापर्यंत झालेल्या टी-२० विश्वचषकांमध्ये तब्बल पाच वेळा भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले असून या पाचही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे.
यावरच स्टार स्पोर्ट्सची नवी जाहिरात बेतलेली आहे. २०१५ च्या क्रिकेट विश्वचषकापासून स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर ‘मौका मौका’ या थीमच्या जाहिराती करायला सुरुवात केली. या जाहिरातींना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसला. त्यामुळेच अजूनही हा ट्रेंड स्टार स्पोर्ट्सने सुरु ठेवला आहे.