काबुल विमानतळावर चेंगराचेंगरीत जीवितहानी

काबुल विमानतळावर चेंगराचेंगरीत जीवितहानी

काबुल विमानतळाबाहेर हजारो अफगाण नागरिकांनी गर्दी केली आहे. तालिबानने कब्जा केल्यानंतर अफगाण नागरिक अफगाणिस्तानमधून पळ काढायला बघत आहेत. यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आहे. याच चेंगराचेंगरीत ७ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाल्याचं ब्रिटिश सैन्याने सांगितले आहे.

आपल्या नागरिकांची सुखरुप सुटका करायला गेलेल्या अमेरिकन सैन्याने काबुल एयरपोर्टवर गोळीबार केल्याचं वृत्त आहे. या गोळीबारात किमान पाच लोक मृत्यूमुखी पडले असून अनेकजण जखमी झाले आहेत. रॉयरटर्स या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. काबुल एयरपोर्टवर आपापल्या देशात जाण्यासाठी हजारो नागरिक जमले असताना अमेरिकेच्या सैन्याने हा गोळीबार केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

अफगाणिस्तानवर आता तालिबानने नियंत्रण प्रस्थापित केलं असून राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले आहेत. या बिघडलेल्या परिस्थितीमुळे अफगाणिस्तानमध्ये आता अनागोंदी माजली आहे. त्या पार्श्वभूमीवर जगभरातल्या ६० हून अधिक देशांनी आपल्या देशातील नागरिकांची सुखरुपपणे सुटका करावी अशी विनंती तालिबानकडे केली आहे.

भारतानेही रविवारी आपल्या १२४ नागरिकांना आणि इतर अफगाणी नागरिकांना सुखरुपपणे भारतात परत आणले. अफगाणिस्तानमधील परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारने एयर इंडियाला अद्याप दोन विमानं तयारीत ठेवायला सांगितलं आहे. ब्रिटनने आपल्या दूतावासातील अधिकारी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ६०० सैनिकांची तुकडी पाठवली.

हे ही वाचा:

ठाकरे सरकार हे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे

माझा कोणावरही विश्वास नाही

तालिबानचे हजारो दहशतवादी लवकरच पंजशीरमध्ये जाणार?

पंजशीर विरुद्ध तालिबान

संयुक्त राष्ट्राचे प्रमुख ऍन्टोनिया गुटेरस यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर बोलताना तालिबानने हिंसाचाराचा मार्ग सोडावा असं आवाहन केलं होतं. महिला आणि बालकांचे अधिकार आणि सुरक्षा यावर त्यांनी विशेष चिंता व्यक्त केली होती.

Exit mobile version