एसटीचे कर्मचारीही थकले आणि त्यांचे वेतनही

एसटीचे कर्मचारीही थकले आणि त्यांचे वेतनही

कोरोना महामारीमुळे समाजातील सर्वच घटकांना आर्थिक फटका बसला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या आर्थिक स्थितीवरही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या निर्बंधाचा चांगलाच तडाखा बसला आहे.

ऑगस्ट महिना संपत आला तरीही परिवहन मंडळाने सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन अद्याप दिलेले नाही. निर्बंधांमुळे प्रवासी संख्येत घट झाली आणि त्याचा परिणाम हा एसटी बसमधून निर्माण होणाऱ्या उत्पन्नावर झाला आहे.

टाळेबंदीपूर्वी परिवहन मंडळाचे उत्पन्न २० करोड होते ते आता प्रवासी संख्या घटल्यामुळे सात ते आठ करोड इतके आहे. या उत्पन्नातून गाड्यांसाठीचा डीझेल खर्च भागवला जातो. मंडळाच्या दहा हजार बस सेवा देत आहेत त्यांना दिवसाला सुमारे आठ लाखांचं डीझेल लागते, अशी माहिती परिवहन मंडळाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. अर्धा महिना आता संपला आहे तरीही कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. मागील काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळालेले नाही.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींची लाल किल्लयावरून ‘सबका प्रयास’ची हाक

महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

‘वंदे भारत’ गाड्यांबाबत मोदींची मोठी घोषणा

भारताच्या ऑलिम्पिक चमूसोबत राष्ट्रपतींची ‘चाय पे चर्चा’

घरातील रोजच्या खर्चासाठी आम्हाला धडपड करावी लागत आहे. मी गृहिणी होती, पण आता पतीचे वेतन वेळच्यावेळी मिळत नसल्यामुळे मला दुकानात काम करावे लागत आहे, अशी माहिती कल्याण डेपोतील  एका बस वाहकाची पत्नी सुशीला चव्हाण यांनी सांगितली. हीच परिस्थिती सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची आहे. परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर महिन्याला २८० करोड रुपये खर्च होत असतात. उत्पन्न खर्च वाढवून खर्च कमी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ करत आहे.

Exit mobile version