श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा राजीनामा; आंदोलकांनी रानिल विक्रमसिंघेंचं खासगी घर पेटवले 

श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा राजीनामा; आंदोलकांनी रानिल विक्रमसिंघेंचं खासगी घर पेटवले 

भारताचा शेजारी देश श्रीलंकेमध्ये महागाई आणि उपासमारीने बेहाल झालेल्या नागरिकांनी आंदोलन करत निषेध नोंदवला आहे. श्रीलंकेतील आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. संतप्त जमावाने शनिवार, ९ जुलै रोजी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्याच निवासस्थानाला वेढा घालत त्यावर ताबा मिळवला आहे. त्यानंतर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला आहे.

गोटाबाया सरकारने राजीनामा द्यावा या मागणीसाठी श्रीलंकेतील नागरिक रस्त्यावर उतरले असून त्यांनी मोठं आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलकांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या खासगी मालकीच्या घरामध्ये प्रवेश केला. या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले असून आंदोलकांनी त्यांच्या घरात तोडफोड करून घराला आग लावल्याची माहिती समोर आली आहे.

रानिल विक्रमसिंघे यांनी मे महिन्यामध्ये पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतली होती. त्यांनी आता पंतप्रधानपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे.

हे ही वाचा:

डॅशिंग IRS अधिकारी समीर वानखेडे यांचा सन्मान

एलन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्सचा ट्विटर खरेदी करार केला रद्द!

गीता गोपीनाथ ‘आयएमएफ’च्या भिंतीवर झळकलेल्या पहिल्या महिला अर्थशास्त्रज्ञ

शिंदे- फडणवीस सरकारकडून मराठा समाजासाठी ३० कोटींचा जीआर

गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंकेमध्ये गंभीर आर्थिक संकट असून महागाईने उच्चांक गाठला आहे. दुसरीकडे देशावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Exit mobile version