न्युयॉर्कमधील मंदिरानंतर समाजकंटकांकडून कॅलिफोर्नियातील श्री स्वामीनारायण मंदिर लक्ष्य

मंदिरात लिहिले हिंदू विरोधी संदेश

न्युयॉर्कमधील मंदिरानंतर समाजकंटकांकडून कॅलिफोर्नियातील श्री स्वामीनारायण मंदिर लक्ष्य

अमेरिकेत हिंदू मंदिराला लक्ष्य करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील सॅक्रामेंटो भागातील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात समाजकंटकांनी मंदिराचे नुकसान केले आहे. यानंतर या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. मंदिरात हिंदू विरोधी संदेश लिहिण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच न्युयॉर्कमधील बीएपीएस स्वामीनारायण मंदिराला समाजकंटकांनी लक्ष्य केले होते.

वारंवार हिंदू मंदिरांना लक्ष्य केले जात असल्यामुळे अमेरिकेमधील हिंदूंनी भीती व्यक्त करत चिंताही व्यक्त केली आहे. बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात समाजकंटकांनी लिहिलेल्या संदेशांमध्ये ‘हिंदू परत जा’ अशा वाक्यांचा समावेश आहे. त्यामुळे स्थानिक हिंदू समुदायामध्ये चिंता निर्माण झाली आहे. न्युयॉर्कमधील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिराची विटंबना झाल्यानंतर १० दिवसांपेक्षा कमी कालावधीतच आणखी एका हिंदू मंदिराला लक्ष्य करण्यात आले. दरम्यान, बीएपीएसकडून सांगण्यात आले आहे की, आम्ही शांततेसाठी प्रार्थना करून द्वेषाच्या विरोधात एकजुटीने उभे आहोत.

हे ही वाचा:

अंधेरीत महिलेचा उघड्या नाल्यात पडून मृत्यू

उमराह व्हिसाच्या नावाखाली भिकाऱ्यांना पाठवणे थांबवा, सौदी अरेबियाचा पाकिस्तानला इशारा!

जम्मू-काश्मीरचा दुसरा टप्पा पूर्ण, सरासरी ५४ टक्के मतदान!

भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला १० वर्ष पूर्ण!

यापूर्वी अमेरिकेमधील न्युयॉर्कच्या मेलविले परिसरातील बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात समाजकंटकांनी मंदिराचे नुकसान केले होते. मेलविले मध्ये हिंदू मंदिराबाहेरील रस्त्यावर आणि प्रतिक चिन्हांवर स्प्रे पेंटने वादग्रस्त शब्द लिहिण्यात आले होते. अमेरिकन फाउंडेशनने या प्रकरणी न्याय विभागाने आणि गृह सुरक्षा विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. तर, न्युयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने हे प्रकरण अमेरिकन प्रशासनासमोर मांडले होते. भारतीय दूतावासनेही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला होता.

Exit mobile version