‘स्क्विड गेम’मुळे का झाले पाकिस्तानी नाराज?

‘स्क्विड गेम’मुळे का झाले पाकिस्तानी नाराज?

जगभरात नेटफ्लिक्सच्या ज्या ‘स्क्विड गेम’चं कौतुक होत आहे, रसिकांनी डोक्यावर घेतलं आहे, त्या स्क्विड गेमवर पाकिस्तानी मात्र नाराज आहेत. पाकिस्तान्यांच्या या नाराजीमागे पाकिस्तानमधील सामान्य जनतेत असलेला हिंदू द्वेषही सहज दिसून येतो.

अनुपम त्रिपाठी नावाच्या भारतीय अभिनेत्याने अली अब्दुल, दक्षिण कोरियातील एक पाकिस्तानी स्थलांतरित कामगाराची भूमिका साकारली आहे. शोमध्ये “सौम्य, दयाळू आणि निष्ठावंत खेळाडू” म्हणून अनेकांची मने या अभिनेत्याने जिंकली आहेत. पाकिस्तानी प्रेक्षक मात्र यामुळे भलतेच नाराज झाले आहेत. ते असं म्हणतात की हे चित्रपट निर्माते भारतीयांना पाकिस्तानी भूमिका साकारण्यासाठी घेतात, याचा त्यांना कंटाळा आला आहे.

एका ट्विटर वापरकर्त्याने शो चांगला असल्याचे मान्य केले पण लिहिले की, “भारतीय कलाकारांद्वारे मोठ्या टीव्ही मालिकांमध्ये पाकिस्तानी पात्र साकारताना पाहून मी खूप निराश होते. मूळ पाकिस्तानी कलाकारांना अशा भूमिकांसाठी का घेऊ शकत नाही? ”

मनी हाईस्टमध्ये हीच गोष्ट कशी केली गेली याकडे एकाने लक्ष वेधले. ज्यामध्ये भारतीय अभिनेता अजय जेठीने शाकीर नावाच्या पाकिस्तानी हॅकरची भूमिका साकारली होती. तर दुसऱ्या एका पाकिस्तानी प्रेक्षकाने ट्विटरवर खरी खदखद सांगितली. तो असं म्हणाला की, “अनुपम त्रिपाठी नावाचा अभिनेता मुसलमानही नाही.

एका प्रेक्षकाने सांगितले की, “मी स्वत: पाकिस्तानी असल्याने, मी निराश झालो आहे कारण त्यांनी एका पाकिस्तानी अभिनेत्याला भूमिका देण्याऐवजी पाकिस्तानी पात्रासाठी एका भारतीय अभिनेत्याला भूमिका दिली.”

हे ही वाचा:

एलएसीवरील सैनिक शिकणार ‘तिबेटोलॉजि’

देवभूमीत पुन्हा ढगफुटीने हाहाःकार

‘शिवतीर्थावरील इटलीचे दिवे हा योगायोग, की लांगुलचालन?’

‘बांगलादेशी हिंदूंचे रक्षण आणि पुनर्वसन करा!’ काँग्रेस नेत्याची मागणी

पाकिस्तानी प्रेक्षकांच्या या प्रतिक्रियांवरून भारत आणि हिंदूंविषयीचा द्वेष सहज दिसून येतो.

Exit mobile version