क्रीडा जगतातून रशिया, पुतीनची कोंडी

क्रीडा जगतातून रशिया, पुतीनची कोंडी

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धाची जगभर चर्चा सुरु आहे. या युद्धच्या पार्श्वभूमीवर जगादीक पातळीवरून रशियाचा निषेध होताना दिसत आहे. क्रीडा क्षेत्रातूनही विविध पातळीवरून रशियाचा निषेध केला जात आहे. तर रशियावर बंदीची कारवाईही केली जात आहे.

जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक असलेल्या फुटबॉलच्या फिफा या जागतिक संघटनेने रशियाला दणका दिला आहे. कतार येथे होऊ घातलेल्या २०२२ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतून रशियाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर युएफानेही रशियावर निर्बंध घातले आहेत. युएफच्या स्पर्धांमध्ये रशियाच्या लीगमधील क्लब्सना भाग घेता येणार नाहीये.

हे ही वाचा:

‘काचा बदाम’ फेम भुबन बड्याकर यांचा अपघात

‘दाऊदशी संबंधित लोकांना वाचवण्यासाठी ठाकरे सरकारकडे वेळ आहे’

कीवमधील भारतीयांसाठी सर्वात मोठा अलर्ट

युक्रेनला भारताकडून मदतीचा हात

तर या सोबतच आंतरराष्ट्रीय आईस हॉकी संघटनेनेही रशिया आणि बेलारूस या दोन संघांवर बंदी घातली आहे. युक्रेनवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घातल्याचे सांगितले जात आहे. याचा परिणाम म्हणून हे दोनही संघ एकूण सात आंतरराष्ट्रीय स्पर्धांना मुकणार आहेत. यामध्ये फिनलँडमध्ये होऊ घातलेल्या विश्वचषकाचाही समावेश आहे.

या व्यतिरिक्त रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यावर वैयक्तिक पातळीवरही कारवाई करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ज्युडो संघटनेने पुतीन यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडे असलेले अध्यक्षपद काढून घेतले आहे. तर तायक्वांडो संघटनेने पुतीन यांच्याकडे असलेला ब्लॅक बेल्ट काढून घेतला आहे. पण असे असले तरी देखील रशिया युद्धातून मागे हटायला तयार नाही.

Exit mobile version