राष्ट्रपतींवर हत्येच्या कटाचा आरोप करणाऱ्या श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांची उचलबांगडी

क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांना मंत्रीपदावरून हटविले

राष्ट्रपतींवर हत्येच्या कटाचा आरोप करणाऱ्या श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांची उचलबांगडी

भारताचे शेजारी राष्ट्र श्रीलंका सध्या राजकीय अस्थिरतेला तोंड देत आहे. श्रीलंकेचे क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांना पदावरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रोशन यांनी क्रिकेट बोर्डातील भ्रष्टाचार संपवल्यामुळे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे हे माझी हत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आलं.

श्रीलंका सरकारमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, रोशन रानासिंघे यांना आठवड्याच्या कॅबिनेट बैठकीपूर्वीच पदावरून हटवण्यात आले आहे. रोशन यांनी जर त्यांची हत्या झाली तर राष्ट्रपती रनिल विक्रमसिंघे यांना जबाबदार धरण्यात यावं अशा आशयाचे वक्तव्य केले होते.

रोशन म्हणाले होते की, क्रिकेट बोर्डातील भ्रष्टाचार संपवल्यानंतर माझी हत्या होईल अशी मला भीती आहे. रानासिंघे यांनी संसदेत सांगितले की, श्रीलंका क्रिकेट बोर्ड चालवण्यावरून विक्रमसिंघे यांच्यासोबत माझे टोकाचे मतभेद झाले. जर माझी रस्त्यात हत्या झाली तर राष्ट्रपती आणि चिफ ऑफ स्टाफ याला जबाबदार असतील. या गंभीर आरोपांवर विक्रमसिंघे यांच्याकडून लगेचच कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. मात्र, त्यानंतर त्यांच्या कार्यालयाकडून क्रीडा मंत्र्यांची उचलबांगडी केल्याचे सांगण्यात आले.

हे ही वाचा:

अवकाळी पावसामुळे वीज कोसळून २० जणांचा मृत्यू!

अवकाळी पावसाच्या हजेरीने मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली

उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या मदतीला कोल इंडिया

खलिस्तानी दहशतवादी अर्शदीपच्या दोन शूटर्सला ठोकल्या बेड्या

माजी क्रीडामंत्री रानासिंघे यांनी या महिन्यातच भ्रष्टाचाराचे आरोप करत संपूर्ण श्रीलंकन क्रिकेट बोर्ड बर्खास्त केलं होतं. श्रीलंकन क्रिकेट बोर्ड ही दिवळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या श्रीलंकेतील सर्वात श्रीमंत संस्था आहे. या बोर्डात सरकारचा हस्तक्षेप झाल्यानंतर आयसीसीने त्वरित पावले उचलत श्रीलंका क्रिकेटवर बंदी घातली होती.

Exit mobile version