24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनिया‘दहशतवादी उद्योगाचे प्रवक्ते’, जयशंकर यांनी बिलावलना सुनावले

‘दहशतवादी उद्योगाचे प्रवक्ते’, जयशंकर यांनी बिलावलना सुनावले

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बिलावल यांना सुनावले

Google News Follow

Related

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या पराराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेसाठी गोव्यात आलेले पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांना ‘दहशतवादी उद्योगाचे प्रवर्तक आणि प्रवक्ते’, असे संबोधून बिलावल यांच्या ‘दहशतवादाला शस्त्र बनवू नका’, या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.

जयशंकर आणि भुट्टो यांनी द्विपक्षीय चर्चा न करता बैठकीत केवळ दहशतवादाच्या मुद्द्याबद्दल चर्चा केली. पाकिस्तानवर पडद्याआड हल्ला करताना जयशंकर यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ‘दहशतवादाचा धोका अव्याहतपणे सुरू आहे. सीमेपलीकडील दहशतवादासह कोणत्याही प्रकारचा दहशतवादाचा बीमोड केला पाहिजे. दहशतवादाचा मुकाबला करणे हे शांघास को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या मूळ आदेशांपैकी एक आहे.’

जयशंकर यांचे नाव न घेता, भुट्टो यांनी ‘दहशतवादाला शस्त्र बनविण्याच्या किंवा त्यासाठी राजनैतिकदृष्ट्या फायदा मिळवण्याचा प्रयत्न करू नका,’ अशी टीका केली होती. त्यानंतर संध्याकाळी परिषद बैठकीच्या समाप्तीनंतर, जयशंकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दहशतवादाच्या उद्योगाचे प्रवर्तक, एकतर्फी निर्णय घेणारे आणि प्रवक्ते म्हणून उल्लेख करून समाचार घेतला.

‘एससीओ सदस्य देशाचे परराष्ट्र मंत्री म्हणून भुट्टो झरदारी यांना त्यानुसार वागणूक देण्यात आली. मात्र याच बैठकीत पाकिस्तानचा मुख्य आधार असलेल्या दहशतवाद उद्योगाचे प्रवर्तक, एकतर्फी न्याय देणारे आणि प्रवक्ते म्हणून त्यांच्या भूमिकेचा निषेधही करण्यात आला,’ असे जयशंकर म्हणाले.

हे ही वाचा:

इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनच्या राज्याभिषेक सोहळ्याला हिंदू धर्मगुरूंची उपस्थिती

दाऊद इब्राहिमचा प्रश्न ऐकताच पाकिस्तानचे बिलावल गडबडले!

पाकिस्तानमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ शिक्षकांचा मृत्यू

सुदानमधून ३,८०० भारतीय सुखरूप मायदेशी परतले 

जयशंकर यांनी असेही नमूद केले की भारत राजनैतिकदृष्ट्या फायदा मिळवण्यासाठी नव्हे तर राजकीयदृष्ट्या आणि मुत्सद्दीपणे जगासमोर पाकिस्तानचा पर्दाफाश करत आहे. भारत-पाक संबंधांच्या संदर्भात, जयशंकर यांनी बिलावल यांच्या भारतभेटीला काही महत्त्व नसल्याचेही ठामपणे सांगितले.

हिना रब्बानी खार यांनी सन २०११मध्ये भारताचे माजी परराष्ट्र मंत्री एसएम कृष्णा यांची भेट घेतल्यापासून पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांची ही पहिलीच भारत भेट आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा