गेले जिनपिंग कुणीकडे? चीनच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल तर्कांना उधाण

गेले जिनपिंग कुणीकडे? चीनच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल तर्कांना उधाण

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या तब्येतीच्या वावड्यांनी सध्या जगभरातील मीडीयाला चांगलेच खाद्य पुरवले आहे. शी जिनपिंग यांची तब्येत ठिक नसल्याचे गेल्या काही दिवसांपासून माध्यमातून समजत आहे. त्यामुळेच सध्याच्या घडीला शी जिनपिंग हा मुद्दा आंतरारष्ट्रीय वर्तुळात चांगलाच चर्चिला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ६०० दिवसात चीनच्या अध्यक्षांनी एकदाही परदेश दौरा केलेला नाही. त्यामुळेच आता जिनपिंग यांच्या तब्येतीविषयी तर्कांना उधाण आले आहे. यापूर्वी १८ जानेवारी २०२० रोजी म्यानमारला भेट दिली होती. तेव्हापासून त्यानंतर त्यांनी कोणताही दौरा केला नाही.

इतकेच नाही तर अलीकडील परिस्थिती दर्शवते की शी जिनपिंग कोणत्याही परदेशी नेत्याला वैयक्तिकरित्या भेटत नाहीत. चिनी राष्ट्राध्यक्षांची भेट घेण्याचे ठरलेले कोणतेही परदेशी नेते भेट देत नाहीत. परराष्ट्र मंत्री इतरांना भेटताना बीजिंग सोडून इतर शहरांमध्ये भेटतात.

आरोग्याच्या कारणास्तव, जिनपिंग आता अधिकाधिक दूरध्वनीवरून संभाषण करत आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, जर्मन चान्सलर अँजेला मर्केल आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह सुमारे ६० राष्ट्रप्रमुखांशी दूरध्वनीवर चर्चा केली. यंदा त्यांनी डझनभर आंतरराष्ट्रीय सभांना हजेरी लावली, परंतु त्या सर्वांमध्ये आभासी उपस्थिती लावली. त्यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याऐवजी आभासी माध्यमातून ब्रिक्स बैठकीत भाग घेतला. याशिवाय, ऑक्टोबर २०२१ मध्ये रोम येथे होणाऱ्या जी २० शिखर परिषदेत जिनपिंग यांच्या वैयक्तिक उपस्थितीचीही पुष्टी झालेली नाही.

हे ही वाचा:

अमेरिकेने जीव वाचवून पळ काढला

काँग्रेस शासित राजस्थानमध्ये हिंदू मुलाचे ‘लिंचिंग’

दहशतवादी रिजवान मोमीनला मुंब्र्यातून अटक

कधी काळी थाटला होता संसार, आता बिग बॉसच्या घरात एकत्र

राष्ट्रपती जिनपिंग यांनी कोणतेही कारण न सांगता चीनमधील अमेरिकेचे परराष्ट्र सचिव, सिंगापूरचे पंतप्रधान, डॅनिश पंतप्रधान यांच्यासोबतच्या बैठका पुढे ढकलल्या आहेत, असेही अहवालात म्हटले आहे.

Exit mobile version