राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्याकडून मोदींना खास ‘शर्ट’ भेट

सीईओसोबत झालेल्या बैठकीत अमेरिकी अध्यक्ष जो बायडन यांच्याकडून भेट

राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्याकडून मोदींना खास ‘शर्ट’ भेट

भारतीय-अमेरिकी कंपन्यांच्या सीईओसोबत झालेल्या बैठकीत अमेरिकी अध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास शर्ट भेट दिले. ज्यावर लिहिले आहे, ‘The future is AI’ – म्हणजेच ‘कृत्रिम बुद्धिमत्ता हेच भविष्य आहे.’ या अक्षरांखाली इंग्रजीत अमेरिका आणि इंडिया (एआय) असे लिहिले आहे.

राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जेव्हा मोदी यांना हे शर्ट भेट दिले, तेव्हा मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा, ऍप्पलचे सीईओ टिम कूक आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. सर्वांनी टाळ्या वाजून मोदी यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर छायाचित्र प्रदर्शित करत ‘भविष्य एआयचे आहे, मग ती कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा अमेरिका-भारत’ असे लिहिले आहे. जेव्हा आपण एकत्र काम करतो, तेव्हा आपले राष्ट्र मजबूत होते आणि सर्व जगालाही लाभ होतो,’ असेही त्यांनी लिहिले आहे.

मोदी यांनी अमेरिकी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना अमेरिका आणि भारताचा उल्लेख कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भात केला होता. तेव्हा त्यांनी ‘भविष्य एआयचे आहे आणि एक एएआय अमेरिका-इंडियाचेही आहे,’ असे म्हटले होते. ‘गेल्या काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानात खूप प्रगती झाली आहे. तसेच, दुसरे एआय म्हणजेच अमेरिका आणि इंडिया (भारत)मध्येही महत्त्वाचे विकास झाले आहेत, असे सांगून दोन्ही देशांमधील तंत्रज्ञानातील प्रगतीचा उल्लेख केला आणि या दोन्ही देशांना संक्षिप्त नाव दिले.

हे ही वाचा:

‘सर्वांना वाटतं, मी योग्य व्यक्ती आहे’

अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यावरून पंतप्रधान मोदी इजिप्तला रवाना

पुढच्या इयत्तेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पाचवी, आठवीच्या परीक्षेत पास व्हावचं लागणार!

‘प्लेन हायजॅक का प्लॅन है’ असा संवाद साधणाऱ्या प्रवाशाला अटक

भारतातील अमेरिकी राजदूत एरिक गार्सेटी यांनीही पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ‘एआय हेच भविष्य आहे- अमेरिका आणि भारत’ असे प्रतिपादन केले. आपण इतिहासात अन्य देशांच्या तुलनेत अधिक कार्य केले आहे. हा एक असाधारण दौरा होता. आता आपण संपूर्ण इतिहासात सर्वाधिक गाढ मैत्रीमध्ये बांधलो गेलो आहोत, असे ते म्हणाले.

Exit mobile version