ठाण्यात रशिया-युक्रेन युद्धावर विशेष व्याख्यान

ठाण्यात रशिया-युक्रेन युद्धावर विशेष व्याख्यान

युक्रेन आणि राहसीय यांच्यातले युद्ध दिवसेंदिवस अधिकच चिघळत आहे.अशा परिस्थिती या युद्धाचे भारतावर होणाऱ्या परिणामांची चिंता साऱ्या देशाला सतावत आहे. या युद्धाचे जगावर आणि भारतावर काय परिणाम होतील याचे विश्लेषण होणे गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेऊनच ठाण्यातील दीनदयाळ प्रेरणा केंद्र या संस्थेच्या वतीने प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

दीनदयाळ प्रेरणा केंद्रातर्फे ‘रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध आणि भविष्य’ या विषयावर व्याख्यान योजले गेले आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि परराष्ट्र धोरण, संरक्षण नीती, युद्धशास्त्र अभ्यासक दिवाकर देशपांडे हे प्रमुख वक्ते असणार आहेत. तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ज्ञ प्रा. मिलिंद मराठे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत.

हे ही वाचा:

मणिपूरमध्ये नेत्याच्या घरावर बॉम्ब हल्ला

युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारचा हा मोठा निर्णय

…आणि लिबियातून भारतीयांची जलदगतीने सुटका केल्याच्या बतावणीत काँग्रेस मग्न

रशिया काही तास बॉम्बवर्षाव करणार नाही…हे आहे कारण!

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सोमवार, दिनांक ७ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता सहयोग मंदिर सभागृह, पहिला मजला सहयोग मंदिर पथ, नौपाडा, ठाणे पश्चिम येथे होईल. प्रवेश विनामूल्य असलेल्या या व्याख्यानाला मास्क घालून यावे असे आवाहन दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भा.वा. दाते आणि कार्यवाह मकरंद मुळे यांनी केले आहे. दोन वर्षांनी दीनदयाळ प्रेरणा केंद्राने जाहीर कार्यक्रम योजला आहे. ठाण्यातील दीनदयाळ प्रेरणा केंद्र १९९५ पासून वैचारिक, बौद्धिक क्षेत्रात कार्यरत आहे.

Exit mobile version