स्पेशल ३२ ना प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार

स्पेशल ३२ ना प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार

देशातील बत्तीस मुलांचा पंतप्रधानांच्या हस्ते ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ देऊन गौरव होणार आहे. संशोधन, खेळ, कला, संस्कृती अशा विविध क्षेत्रा अतुलनीय कार्याबद्दल देशभरातील मुलांना हा पुरस्कार दिला जातो.

महिला व बालविकास कल्याण मंत्रालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार एकवीस राज्ये आणि केंद्र शासीत प्रदेशातील ३२ मुलांना यंदाचा हा पुरस्कार दिला जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच मुलांचा समावेश आहे. शौर्य पुरस्कार- कामेश्वर वाघमारे (जि. नांदेड), नवनिर्माणासाठी- श्रीनभ अग्रवाल (नागपूर) व आर्चीत पाटील (जळगाव), शैक्षणिक प्रकल्पांसाठी- सोनित सिसोलेकर (पुणे) तर क्रिडी क्षेत्रात- काम्या कार्तिकेयन (मुंबई) यांना पुरस्कार मिळाले आहेत.

कामेश्वर वाघमारे नांदेडचा रहिवासी असणाऱ्या या मुलाने अतुलनीय कामगिरी करून दाखवली आहे. त्याबद्दलचा त्याला शौर्य पुरस्कार देण्यात येत आहे. नांदेडच्या कंधार तालुक्यात घोडा गावाच्या जवळून वाहणाऱ्या नदीत तीन मुले अंघोळ करत होती. अचानक पाण्याच्या प्रवाहात अडकून तिघे बुडू लागले. त्यांना बुडताना पाहून क्षणाचाही विचार न करता कामेश्वरने नदीत उडी मारून त्या तिघांचा जीव वाचवला. त्यावेळी त्याने आपला जीव पणाला लावला.

देशातील एकूण पुरस्कारांपैकी सात पुरस्कार कला आणि सांस्कृतीक क्षेत्रासाठी, नऊ पुरस्कार नवनिर्माणासाठी आणि पाच पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रासाठी, सात पुरस्कार खेळातील उल्लेखनीय कामगिरी करिता तर तीन शौर्य पुरस्कार आणि सामाजिक सेवेसाठी एका मुलाला हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

या सर्व मुलांचे देशातून मोठ्या प्रमाणात कौतूक होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी देखील या मुलांचे कौतूक केले आहे.

Exit mobile version