एनसीबीच्या समीर वानखेडेंचे केंद्राने का केले कौतुक?

एनसीबीच्या समीर वानखेडेंचे केंद्राने का केले कौतुक?

केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी विशेष पदक जाहीर केले आहे. उत्कृष्ट तपास करणाऱ्या देशातील १५२ पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्यांच्या कामगिरीसाठी विशेष पदक जाहीर करण्यात आले आहे. या यादीत राज्यातील ११ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय (मुंबई) संचालक समीर वानखेडे यांनाही हे पदक जाहीर झाले आहे. केंद्र सरकारने २०१८ मध्ये हे पदक देण्यास सुरुवात केली. क्लिष्ट गुन्ह्यांचा विशेष कौशल्यांच्या आधारे उत्कृष्ट तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे विशेष पदक दिले जाते. पोलिसांमध्ये तपास कार्यात उच्च व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा म्हणून हे विशेष पदक दिले जाते.

हे ही वाचा:

नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा मार्ग ठरला

त्या लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याला बेड्या

राहुल गांधींना निलंबित करा

कंदहार पडले, तालिबानची राजवट अटळ?

पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी, अजित टिके, उमेश माने- पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बधे, प्रीती टिपारे, पोलीस निरीक्षक ममता डिसुझा, मनोहर पाटील, सुनील शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका जाधव, राहुल बहुरे या पोलीस अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या १५ अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Exit mobile version