…ते चार सर्वसामान्य नागरिक जात आहेत अंतराळ पर्यटनाला

…ते चार सर्वसामान्य नागरिक जात आहेत अंतराळ पर्यटनाला

अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापर्यंत पोचविणे आणि तेथून पृथ्वीवर यानाद्वारे सुखरूप आणण्यात यशस्वी ठरलेली एलन मस्क यांची ‘स्पेसएक्स’ कंपनी बुधवारी (१५ सप्टेंबर) नवा इतिहास रचणार आहे. या कंपनीतर्फे सामान्य नागरिकांना अंतराळात पाठविण्यात येणार आहे. या मोहिमेत चार नागरिकांचा समावेश असून या मोहिमेला ‘इन्स्पिरेशन ४’ असे नाव देण्यात आले आहे.

स्पेसएक्सचे यान फ्लोरिडाच्या केनडी स्पेस रिसर्च सेंटर येथून अवकाशात भरारी मारेल. हवामानाचा अंदाज घेऊन कंपनी उड्डाणाबाबत निर्णय घेईल. या मोहिमेतून चार सामान्य नागरिकांना अंतराळाची सैर करण्याची संधी मिळणार आहे. ‘इन्स्पिरेशन ४’ या मोहिमेच्या माध्यमातून अंतराळ पर्यटनास प्रोत्साहन मिळणार आहे.

हे ही वाचा:

दोन दिवसांत पेट्रोल डिझेलचे भाव अर्ध्यावर?

‘आयपीएल’मध्ये आणखी दोन संघ मैदानात उतरणार!

मुंबईमध्ये डेंग्यूचा ‘ताप’ वाढला!

गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या ‘या’ निर्णयाने लव्ह जिहादला बसणार फटका

या मोहिमेत जेअर्ड इसॅकमॅन, शॉन प्रॉक्टर, हेली अर्केनो, ख्रिस सॅम्ब्रोस्क या सदस्यांचा सहभाग आहे. जेअर्ड इसॅकमॅन हे मोहिमेचे नेतृत्व करणार असून इ- कॉमर्स कंपनी ‘शिफ्ट ४ पेमेंट्स’चे ते संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. शॉन प्रॉक्टर या एका महाविद्यालयात प्राध्यापक असून ‘नासा’च्या अनेक मोहिमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. हेली अर्केनो ही पृथ्वी भोवतीच्या कक्षेत पाठवली जाणारी आणि अवकाशात कृत्रिम अवयव घेऊन जाणारी पहिली युवा अमेरिकन ठरणार आहे. मोहिमेत ती वैद्यकीय व्यवस्थापकाच्या भूमिकेत असेल. ख्रिस सॅम्ब्रोस्क हे अमेरिकेच्या हवाई दलात वैमानिक होते. सध्या ते ‘लॉकहिड मार्टिन’ कंपनीबरोबर काम करत आहेत.

‘इन्स्पिरेशन ४’ ही पृथ्चीच्या कक्षेत जाणारी पहिली बिगर व्यावसायिक अंतराळवीरांची मोहीम आहे. ‘इन्स्पिरेशन ४’ हे पृथ्वीच्या काक्षेभोवती फिरणार आहे. ‘इन्स्पिरेशन ४’ मोहीम तीन दिवसांची आहे. या यानात दोन प्रशिक्षित वैमानिक आहेत, पण यानाचे संचलन करण्यात त्यांचा सहभाग नसेल.

Exit mobile version