21 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामापत्रकार परिषद सुरू असतानाचं दक्षिण कोरियाच्या विरोधी पक्ष नेत्यावर हल्ला

पत्रकार परिषद सुरू असतानाचं दक्षिण कोरियाच्या विरोधी पक्ष नेत्यावर हल्ला

चाकूसारख्या धारदार शस्त्राने गळ्यावर हल्ला

Google News Follow

Related

दक्षिण कोरियामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. विरोधी पक्ष नेते ली जे-म्युंग हे माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांच्यावर अचानक हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्या पक्षाची प्रेस कॉन्फ्रस सुरू असताना त्यांच्या गळ्यावर वार करण्यात आले. बुसान येथे ही पत्रकार परिषद सुरु होती.

दरम्यान ली जे-म्युंग हे बुसान शहरातील नवीन विमानतळाच्या बांधकामाच्या जागेला भेट देण्यासाठी आले होते. त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते. दरम्यान एक व्यक्ती त्यांच्याकडे ऑटोग्राफ मागण्यासाठी पुढे आला आणि अचानक त्याने हातातील शस्त्राने ली यांच्या मानेवर वार केला.

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात दिसत आहे की, वार केल्यानंतर ली जमिनीवर पडले. त्यानंतर ली यांच्या आजूबाजूच्या लोकांनी हल्लेखोराला लगेच पकडले. त्यांच्या गळ्यावर डाव्या बाजूला जखम झाली आहे. तसेच हल्लेखोराला तात्काळ अटक करण्यात आली आहे. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात पोहचवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दक्षिण कोरियाच्या प्रसारमाध्यमांनी प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने म्हटले आहे की, हल्लेखोराने ली यांच्या मानेवर वार करण्यासाठी चाकूसारख्या शस्त्राचा वापर केला.

मीडिया रिपोर्टनुसार, हल्लेखोराचे वय ५० ते ६० दरम्यान होते. या घटनेनंतर घेतलेल्या फोटोमध्ये ली यांच्या गळ्यावर रुमाल बांधलेला दिसत होता. पोलिसांकडून या संबंधी अधिकच तपास सुरू आहे.

हे ही वाचा:

दाऊदच्या आईच्या चार मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव!

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक!

अरुण योगीराज यांनी साकारलेल्या राममूर्तीची होणार प्रतिष्ठापना!

अर्जुन पुरस्कार विजेत्या पोलीस उपाधीक्षकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

ली जे-म्युंग हे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ कोरियाचे नेत आहेत. ते सध्या दक्षिण कोरियाच्या विधानसभेचे सदस्य नाहीत, परंतु एप्रिल २०२४ मध्ये होणार्‍या पुढील सार्वत्रिक निवडणुकीत ते एका जागेसाठी उभे राहतील अशी अपेक्षा आहे. ते २०२२ च्या अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष यून सुक-योल यांच्याकडून केवळ ०.७३ टक्के मतांच्या फरकाने पराभूत झाले. दक्षिण कोरियाच्या इतिहासातील ही सर्वात बरोबरीची राष्ट्राध्यक्षपदाची शर्यत होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा