दक्षिण कोरियामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून दक्षिण कोरियातील अधिकाऱ्यांनी राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांना अटक केली आहे. राष्ट्राध्यक्ष युन यांनी गेल्या महिन्यात अचानक देशात मार्शल लॉ लागू केला होता, त्यानंतर त्यांच्यावर देशात खटला सुरू होता. आता मार्शल लॉ घोषणेशी संबंधित बंडखोरीच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.
बुधवारी शेकडो कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी युन यांच्या निवासस्थानी पोहचले होते. यापूर्वीही युन यांना अटक करण्याचे प्रयत्न झाले, मात्र समर्थकांच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. देशात अचानक मार्शल लॉ लागू केल्याबद्दल विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींवर जोरदार टीका केली होती, तर राष्ट्रपतींनी देशाच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले होते.
युन यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे की, त्यांना त्याब्यात घेण्याचे प्रयत्न बेकायदेशीर असून सार्वजनिकरित्या त्यांचा अपमान करण्याचा हा डाव आहे. त्यांच्या अटकेसाठी तपासकांनी दक्षिण कोरियाच्या विद्यमान अध्यक्षाविरुद्ध जारी केलेले पहिले वॉरंट आहे.
हे ही वाचा :
केजारीवालांचा पाय आणखी खोलात; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी खटला चालवण्यास ईडीला परवानगी
बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू मुलांना सायकल वाटप
खासगी प्रवासी वाहतूक : कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार
मौलवीच्या त्रासाला कंटाळून मुस्लिम पिता-पुत्राने स्वीकारला ‘हिंदू धर्म’
यापूर्वी ३ डिसेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांनी अचानक देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली. त्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. या काळात देशात अनेकांना ताब्यातही घेण्यात आले होते. मात्र, या घोषणेनंतर लगेचच देशात हिंसक निदर्शने सुरू झाली आणि अवघ्या सहा तासांनंतर हा आदेश मागे घ्यावा लागला. युन सुक येओल यांनी असा युक्तिवाद केला होता की, देशातील काही राजकीय पक्ष उत्तर कोरियाशी कट रचून देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आणत आहेत, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.