दक्षिण आफ्रिकेचे शेवटचे गोरे अध्यक्ष फ्रेडरिक विल्यम (एफडब्ल्यू) डी क्लर्क यांचे गुरुवारी सकाळी केपटाऊन येथील त्यांच्या घरी वयाच्या ८५ व्य वर्षी निधन झाले. एफडब्ल्यू डी क्लर्क फाउंडेशनने एका निवेदनाच्या माध्यमातून ही माहिती दिली.
“माजी अध्यक्ष एफडब्ल्यू डी क्लर्क यांचे मेसोथेलियोमा कर्करोगाविरूद्धच्या संघर्षानंतर आज सकाळी फ्रेस्नेये येथील त्यांच्या घरी निधन झाले” असे निवेदनात म्हटले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी एलिटा, त्यांची मुले जॅन आणि सुसान आणि त्यांची नातवंडे आहेत, असेही फाउंडेशनने सांगितले.
एफडब्ल्यू डी क्लर्क हे दक्षिण आफ्रिकेचे शेवटचे गोरे अध्यक्ष होते. वर्णभेदवादी क्रांतिकारक, नेल्सन मंडेला, त्यांच्याच राजवटीत मुक्त झाले होते. मंडेला यांच्या सुटकेनंतर, दोन्ही राजकारण्यांनी वांशिक पृथक्करणाच्या धोरणाचा अंत करण्यासाठी एकत्र काम केले होते.
हे ही वाचा:
ऑफिसच्या वेळेनंतर बॉसने फोन करणे आता बेकायदेशीर
WHO: सगळीकडे कोविड केसेस कमी, अपवाद फक्त…
राज ठाकरे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देऊ पण…
मुनगंटीवारांचा ‘तो’ व्हिडिओ अर्धवट
मंडेला दक्षिण आफ्रिकेतील पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रप्रमुख बनले. डी क्लर्क यांना १९८३ मध्ये “वर्णभेदी राजवट शांततापूर्ण संपुष्टात आणण्यासाठी आणि नवीन लोकशाही दक्षिण आफ्रिकेचा पाया घातल्याबद्दल” नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.