ब्रिक्स परिषदेदरम्यान नेते मोदींच्या शेजारी बसू पाहात होते!

दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान होते उत्सुक

ब्रिक्स परिषदेदरम्यान नेते मोदींच्या शेजारी बसू पाहात होते!

इस्रोच्या चांद्रमोहिमेंतर्गत चांद्रयान -३ने चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकत्याच झालेल्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेतील वातावरणाबाबत भाष्य केले. लँडिंग यशस्वी झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूला बसण्याचे जाहीर केले होते. इतकेच नव्हे तर परिषदेत उपस्थित असलेल्या अन्य देशांचे प्रतिनिधीही मोदी यांना शुभेच्छा देण्यासाठी धडपडत होते.

 

लँडिंगनंतर जोहान्सबर्ग येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत अनेक नेते चांद्रयान-३बद्दल बोलत होते. ‘आम्ही जेव्हा तेथे पोहोचलो, तेव्हा चांद्रयान-३बद्दल गप्पा चालल्या होत्या. दुसऱ्या दिवशी, म्हणजे लँडिंगच्या दिवशी २३ ऑगस्ट रोजी आम्ही सकाळच्या सत्रात सहभाग घेतला आणि पंतप्रधान मोदी इस्रोशी संपर्क साधण्यासाठी निघून गेले. दुसऱ्या दिवशीदेखील ब्रिक्समध्ये चांद्रयान ३ मोहिमेबद्दलच गप्पा रंगल्या होत्या. ‘विक्रम’च्या यशस्वी लँडिंगनंतर पंतप्रधानांनी ब्रिक्सच्या नेत्यांना याबाबत अधिक माहिती दिली. तसेच, भारताचे अभिनंदन करणाऱ्या रामफोसा यांचेही आभार मानले. ‘या यशाला केवळ एका देशाचे यश न मानता संपूर्ण मानवजातीचे यश म्हणून स्वीकारले गेले, याचा मला अभिमान वाटतो,’ अशी प्रतिक्रिया यावेळी मोदी यांनी दिली.

हे ही वाचा:

कैदेत असलेल्या वाधवान बंधूंची शहराची सैर

लोकसभेच्या १६० कमकुवत जागा जिंकण्यासाठी अमित शहा सरसावले

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंच्या कंपनीविरोधातील केसचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयकडून सादर

आव्हाडांनी तेलगी प्रकरणातील अदृश्य हात उघड केला; नंतर पोस्ट डीलीट केली

‘ब्रिक्स संमेलनात चांद्रयानाबाबत मोठा उत्साह होता. मला आठवते, एक मोठे यू आकाराचे टेबल होते. त्यावर १०० ते १५० नेते स्थानापन्न झाले होते. ते सर्व अचानक उठले. मोदी यांना सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी त्यांच्याकडे जावे लागले. हे केवळ भारताचे यश नाही, याची खात्री पटत होती,’ असे जयशंकर यांनी सांगितले.

Exit mobile version