वनडे मालिका विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू म्हणतो जय श्री राम

वनडे मालिका विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू म्हणतो जय श्री राम

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरुवातीला कसोटी मालिका गमावली आणि त्यानंतर एकदिवसीय मालिकाही गमावली. भारताचा या एकदिवसीय मालिकेत ३-० असा मोठा पराभव झाला. पहिले दोन सामने भारताने गमावल्यावर तिसऱ्या सामन्यात भारताने चांगला प्रतिकार केला मात्र, ४ धावांनी दक्षिण आफिकेने विजय मिळवला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी त्यांचा विजय जल्लोषात साजरा केला. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा फिरकी अष्टपैलू केशव महाराज याने साजरा केलेला आनंद हा आता चर्चेचा विषय ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा फिरकी अष्टपैलू केशव महाराज याने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली. ‘मालिका अतिशय शानदार होती. संघाचा अभिमान आहे. आम्ही अतिशय मोठा प्रवास करून इथपर्यंत पोहचलो आहोत. आता रिचार्ज होऊन पुढील आव्हानांचा सामाना करण्याची वेळ आहे. जय श्री राम’ अशा शब्दात केशव महाराज याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारतीय वंशाचा केशव महाराज हा दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी तसेच एकदिवसीय संघातील एक महत्वपूर्ण सदस्य आहे.

हे ही वाचा:

वर्ध्यात भीषण अपघात; आमदाराच्या मुलासह ६ विद्यार्थी ठार

राज्यातील ८९ टक्के नमुने हे ओमायक्रोन बाधित; आठव्या चाचणीचे निष्कर्ष

रेल्वेचालक अडीच तास निवांत झोपला आणि गाडी लेट झाली!

व्हाय आय किल्ड गांधी चित्रपटावर बंदीची मागणी

केशव महाराज हा भारतीय वंशाचा दक्षिण आफ्रिकेचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याचा जन्म ७ फेब्रुवारी १९९० रोजी डरबनमध्ये झाला. त्याचे पूर्ण नाव केशव आत्मानंद महाराज असून त्याचे पूर्वज उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरमधले होते. १८७४ मध्ये कामानिमित्त त्याचे पूर्वज डरबनला स्थायिक झाले होते.

केशव याने एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. त्याने दोन वेळा विराट कोहली याला बाद केले तर तिसऱ्या सामन्यातही महत्त्वाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले होते.

Exit mobile version