कॅनडामधील हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ हजारो कॅनेडियन हिंदूंकडून एकता रॅली

कॅनडातील ब्रॅम्प्टन हिंदू सभा मंदिराबाहेर जमले हिंदू

कॅनडामधील हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ हजारो कॅनेडियन हिंदूंकडून एकता रॅली

कॅनडामध्ये पुन्हा एकदा एका हिंदू मंदिरावर आणि तिथे उपस्थित असलेल्या भाविकांवर खालिस्तान्यांनी हल्ला केला. ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरात खलिस्तानींनी भाविकांवर हल्ला केला. यानंतर कॅनडामधील हिंदू मंदिरांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ सोमवारी संध्याकाळी (स्थानिक वेळेनुसार) एक हजाराहून अधिक कॅनेडियन हिंदू कॅनडातील ब्रॅम्प्टन हिंदू सभा मंदिराबाहेर जमले.

एकता रॅलीच्या आयोजकांनी कॅनेडियन राजकारणी आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींवर खलिस्तानींना आणखी पाठिंबा देऊ नये यासाठी दबाव आणला. Coalition of Hindus of North America (CoHNA) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधीचे तपशील दिले आहेत. CoHNA ने दिवाळीच्या आठवड्याच्या शेवटी कॅनडातील हिंदू मंदिरांवर झालेल्या अनेक हल्ल्यांवर प्रकाश टाकला आणि देशातील ‘हिंदुफोबिया’ थांबवण्याचे आवाहन केले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालिस्तान्यांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि म्हटले की भारतीय मुत्सद्दींना धमकावण्याचा भ्याड प्रयत्न होता. नवी दिल्लीने कॅनडाच्या अधिकाऱ्यांकडून योग्य न्याय आणि कायद्याचे पालन केले जाईल अशी अपेक्षा केली आहे. अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे भारताचा संकल्प कधीही कमकुवत होणार नाही. कॅनडाच्या सरकारने न्याय सुनिश्चित करावा आणि कायद्याचे राज्य कायम राखावे, अशी आमची अपेक्षा आहे. बॅम्टन, ओंटारियो येथील हिंदू सभा मंदिरात फुटीरतावाद्यांनी केलेल्या हिंसाचाराचा परराष्ट्र मंत्रालयाने निषेध केल्यानंतर काही तासांनी पंतप्रधान मोदींचे हे कठोर विधान आले आहे.

हे ही वाचा:

ग्रँटरोडच्या हॉटेलच्या खोलीत सापडला सुरतच्या व्यापाऱ्याचा मृतदेह,मृतदेहासोबत होती मुलगी

जेएमएम-काँग्रेसची युती म्हणजे, ‘घुसखोरांची आघाडी’,’माफियांचा गुलाम’

दोस्त दोस्त ना रहा!?

‘राज ठाकरेंनी भेट नाकारली, आता निवडणूक लढवणार’

“आम्ही कॅनडा सरकारला आवाहन करतो की सर्व प्रार्थनास्थळे अशा हल्ल्यांपासून संरक्षित आहेत याची खात्री करा. हिंसाचारात सहभागी असलेल्यांवर कारवाई केली जाईल अशी आम्ही अपेक्षा करतो. कॅनडातील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबद्दल आम्ही खूप चिंतित आहोत,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे.

Exit mobile version