एवढा ‘ज्यू द्वेष’ की ऑलिम्पिकचंही महत्व नाही

एवढा ‘ज्यू द्वेष’ की ऑलिम्पिकचंही महत्व नाही

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन वादाचे पडसाद आता टोक्यो ऑलिम्पिकच्या मैदानातही उमटू लागले आहेत. इस्त्रायलचा ज्युडोपटू तोहार बुटबुल याच्याविरुद्ध खेळण्यासाठी एका आठवड्यात दोन खेळाडूंनी नकार दिला आहे. आधी अल्जेरियाचा फेथी नौरीनने तोहार विरोधातील सामन्यातून नावं मागे घेतलं होतं. त्यानंतर आता सूदानच्या मोहम्मद अब्दुल रसूलनेही तोहार विरोधात खेळायला नकार दिला आहे.

‘अँटी सेमिटीसम’ म्हणजेच ज्यू द्वेष हा इस्लामिक देशांमध्ये मुबलक प्रमाणात आहे. गेल्या काही दशकांमध्ये इस्लामिक देशांतील ज्यूंची संख्या जवळपास शून्य झाली आहे. इस्त्रायल हे ज्यूंचे राष्ट्र या इस्लामिक राष्ट्रांना सहन होत नसल्यामुळे आणि त्यातही इस्रायलकडून तीन वेळा युद्धात पराभव पत्करल्यामुळे हा ज्यू द्वेष अधिकच वाढला आहे.

फेथी नौरीन आणि अब्दुल रसूल या दोघांनी देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन देशात सुरु असलेल्या वादामुळे हा निर्णय घेतला आहे. इस्त्रायल पॅलेस्टाईवर अन्याय करत असल्याची प्रतिक्रिया देत दोन्ही खेळाडूंनी हा निर्णय घेतला. हे दोन्ही खेळाडू पॅलेस्टाईनचे समर्थन करत आहेत.

हे ही वाचा:

रिलायन्सच्या नावाने ‘हा’ नवा विक्रम

राज्यपाल कोश्यारी आज पूरग्रस्तांना भेटणार

लोकहित जोपासण्याचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहिलेला नाही

पुन्हा एकदा मोदी हटाओचे अपयशी प्रयत्न सुरु

सर्वात आधी अल्जेरियाचा जागतिक क्रमवारीत ४६९ व्या क्रमांकावर असणाऱ्या फेथी नौरीनने ७३ किलो वजनी गटात तोहार विरोधात असणाऱ्या सामन्यापूर्वी स्वत:हून नाव मागे घेतलं होतं. पत्रकारांना दिलेल्या माहितीत नौरीन म्हणाला, ”मी ऑलिम्पिक खेळांमध्ये पात्रता मिळवण्यासाठी खूप मेहनत केली आहे. पण माझ्यासाठी पॅलेस्टाईनचा मुद्दा जास्त गंभीर आहे. मी कायमच या मुद्द्याला घेऊन गंभीर आहे. इस्त्राईल करत असलेल्या अत्याचारांचा निषेध म्हणून मी हा निर्णय घेत आहे.” दरम्यान अशा तडकाफडकी निर्णयामुळे ऑलिम्पिक समितीने नौरीनला घरी पाठवलं आहे. दुसरीकडे तोहारला राउंड ऑफ १६ च्या सामन्यात कॅनडाच्या आर्थर मार्गेलिडनकडून पराभव पत्करावा लागला.

Exit mobile version