अमेरिकेतील गोळीबाराच्या घटना थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. शिकागो येथे स्वातंत्र्य दिन परेड दरम्यान गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला असून ५९ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली असून, या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
शिकागो सन-टाइम्सच्या वृत्तानुसार, सकाळी १० वाजता परेड सुरू झाली त्यानंतर अवघ्या १० मिनिटांनी गोळीबार सुरू झाला. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला. अमेरिकेतील शिकागो येथील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी परेडमध्ये अचानाक २२ वर्षीय युवकाने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून, ५९ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून घटनेनंतर तपासादरम्यान घटनास्थळावरून पोलिसांनी एक रायफल जप्त केली आहे.
US: Multiple hurt in Highland Park shooting along July 4th parade in Illinois
Read @ANI Story | https://t.co/1CGopRadYK#IllinoisShooting #GunViolenceinUS #July4Parade pic.twitter.com/le38ozfXFB
— ANI Digital (@ani_digital) July 4, 2022
हे ही वाचा:
मुख्यमंत्री शिंदे ऍक्शन मोडमध्ये; पेट्रोलवरचा व्हॅट कमी करण्याची घोषणा
आदित्य ठाकरेंना वगळून शिवसेनेच्या १४ आमदारांना व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस
पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरच्या दिशेने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोडले काळे फुगे
विधानसभेत एकनाथ शिंदे यांची तुफान बॅटिंग; भाषणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
या दुर्घटनेवर अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी शोक व्यक्त केला आहे. “बंदूक हिंसेविरोधातील आमची लढाई सुरुच राहणार आहे. हिंसा संपवण्यासाठी आमचा संघर्ष सुरुच राहील,” असे त्यांनी म्हटलं. घटनास्थळी पोलिसांनी अलर्ट जारी केला असून नाकाबंदी करण्यात आली आहे.