तुर्कीतील इस्तंबुल शहर बॉम्बस्फोटामुळे हादरले आहे. या आत्मघाती स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला असून, तीसहून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे. या घटनेमागे दहशतवादी संघटनेचा हात असल्याचंही म्हटलं जातं आहे. या स्फोटाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यात या स्फोटाची दाहकता समजते.
रविवारी संध्याकाळी हा स्फोट झाला आहे. तुर्कीतील इस्तंबुल शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या तक्सिम चौकात एक मोठा स्फोट झाला. इस्तंबुलमधील तक्सिम चौकात अनेक दुकाने आहेत. याठिकाणी पर्यटक देखील उपस्थित होते. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला असून, तीसहून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तपास अधिकारी सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी करत असून शहरात सध्या सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. इस्तंबुलमध्ये ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणी एका महिलेने पार्सल ठेवले आणि लगेच ती त्यापासून दूर पळत सुटली. त्यानंतर हा स्फोट झाला असल्याचे अधिकाऱ्यानी सांगितले. या महिलेचा शोध घेतला जात आहे.
A piece of garbage blew himself up in the middle of a crowded area in Istanbul. #Turkey pic.twitter.com/7FOiCJpoiy
— (((Tendar))) (@Tendar) November 13, 2022
हे ही वाचा:
आव्हाड यांचा राजीनामा म्हणजे चर्चगेटची गाडी पकडून मुलुंडला उतरायचे आहे असे म्हणण्यासारखे!
आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस; सर्वसामान्यांचे हाल
आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचे ‘अशुद्ध’ ट्विट व्हायरल
दरम्यान, तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांनी या स्फोटामागे दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे म्हटले आहे. तसेच दोषी असलेल्यांना शोधलं जाणार असून, त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.