पाकिस्तानमध्ये एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला आहे. या दुर्घटनेमध्ये लष्कराच्या दोन मेजरसह सहा जवानांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी रात्री उशिरा हरनाई जिल्ह्यातील खोस्त शहराजवळ घडला. हेलिकॉप्टरमधील दोन पायलट्सला वाचवण्यात यश आलं आहे.
रविवारी रात्री उशिरा हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यात मेजर खुर्रम शहजाद (वय ३९) आणि मेजर मोहम्मद मुनीब अफजल (वय ३०), सुभेदार अब्दुल वाहिद (वय ४४), हवालदार मुहम्मद इम्रान खान (वय २७), नाईक जलील (वय ३०) आणि हवालदार शोएब (वय ३५) यांनी प्राण गमावला आहे.
Two Pakistan Army majors were among six military personnel who were martyred when a helicopter crashed in Balochistan, reports Pakistan's Geo News
— ANI (@ANI) September 26, 2022
हे ही वाचा:
नवरात्र २०२२ : महाराष्ट्रातील महिलांना मुख्यमंत्र्यांची विशेष भेट
भारतात चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात ‘ऑपरेशन मेघदूत’
बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी
नवरात्र २०२२: महाराष्ट्राचं शक्तीस्थळ तुळजापूर
यापूर्वी ऑगस्टमध्ये पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला होता. त्यात सहा जवानांचा मृत्यू झाला होता. टेक ऑफ झाल्यानंतर हे हेलिकॉप्टर काही वेळातच अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे हेलिकॉप्टर लासबेला येथे येथे आढळून आले होते.