मला जाळू नका, जमिनीत गाडून टाका. सोबत काय येईल, मागे काय राहील? मातीचा पदर पांघरून मला ‘धरती’ पोटात घेईल, मृत्यूपूर्वी सिंधुताई सपकाळ यांनी लिहिलेली ही कविता जणू त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी मृत्यूची झालेली चाहूलच होती.जन्मलो तेव्हाच नेत्री आसवे घेऊन आलो
दे तुझी आकाशगंगा बोल मी केव्हा म्हणालो,विसरून जा विसरून जा , तुजलाच तू विसरून जा
तुझियाच आयुष्याचिया हाकांसवे हरवून जा, काय माझ्या सोसण्याची एवढी झाली प्रशंसा?
काय माझ्याहून माझा हुंदका खंबीर होता?, काय आगीत कधीही आग जळाली होती?
लोक नेतील मला खोल पुरायासाठी..’
या सुरेश भटांच्या ओळी माईच्या अत्यंत आवडत्या होत्या तेच त्यांच्या आयुष्याचे सार होते.
एक दोन नाही तर चक्क हजारों मुलांची असलेली माय म्हणजेच,अनाथांची माय सिंधुताई सपकाळ आज सिंधुताईंचा पहिला स्मृतिदिन.
कुटुंबात नकोशी झालेली चिंधी ते हजारो मुलांची माई असाच सिंधुताईंचा प्रवास होता .
शालेय शिक्षण आणि वाचनची प्रचंड आवड असूनसुद्धा शिक्षण फक्त चौथीपर्यंतच झाले. कुठलाही कागद हातात आल्यावर आधी अधाशासारखा वाचून काढायचा म्हणूनच कदाचित त्या एकपाठी होत्या. कितीतरी कविता , गाणी, गझल्स त्यांना मुखोदगत होत्या. भट साहेबांचे कितीतरी शेर त्यांना कायम लक्षात असत.
हे ही वाचा:
अजित पवार माफी मागा, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही
अमेय घोले उद्धव गटाकडून शिंदे गटाच्या वाटेवर?
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताय मग हे वाचाच!
‘विज्ञानामुळे महिलांचे सशक्तीकरण आणि महिलांमुळे विज्ञान सशक्त होते’
व्याख्यानात नेमक्या वेळी यातील काही समर्पक शेर आणि कविता तिच्या तोंडून उत्स्फूर्तपणे बाहेर पडायच्या.
महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम या कर्मभूमीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास, अत्यंत आवडती दैवते महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि महर्षी कर्वे यांच्या कर्मभूमीत- पुण्यात- येऊन काहीशा त्या विसावल्या अनाथ लेकरांना केवळ निवारा किंवा मायेची सावली देऊन उपयोग नाही, तर ती सर्व मुले स्वत:च्या पायावर ताठ पणे उभी राहिली पाहिजेत याकडे त्यांचा कटाक्ष होता. त्यासाठी त्यांनी वसतिगृहे उभारली. त्यांच्या शिक्षणाची सोय केली. शिक्षणसंस्था उभारल्या . गाईंच्या संगोपनासाठी वर्धा येथे गोशाळा उभारली आणि तेच त्यांचे जीवनकार्य बनून गेले. त्यासाठी केलेल्या सततच्या भटकंतीमुळे माईंनी स्वत:च्या आरोग्याची अक्षम्य हेळसांड केली
अनाथ मुलांना प्रेमाचा घास भरवत डोक्यावर मायेचा हात फिरवणारी ही अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन