भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यापूर्वीच बाहेर फेकली गेली आहे. १६व्या मानांकित सिंधूला जपानच्या नोझोमी ओकुहाराने पराभूत केले. ओकुहाराने हा सामना २१-१४, २१-१४ अशा फरकाने जिंकला.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पाच पदके जिंकणाऱ्या सिंधूकडून अपेक्षा होती पण तिला यावेळी तशी कामगिरी करता आली नाही. २०१७मध्ये सुवर्ण आणि २०१९मध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या ओकुहाराला सामना जिंकण्यात फारसे कष्ट पडले नाहीत.
२०१७च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधू आणि ओकुहारा यांच्यात ११० मिनिटांची रॅली खेळली गेली होती. त्यामुळे यावेळीही अशाचप्रकारचा आव्हानात्मक खेळ पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती पण दुसऱ्याच फेरीत सिंधूचे आव्हान अगदी सहज संपुष्टात आले.
गेल्या वर्षभरात दोन्ही खेळाडू दुखापतींचा सामना करत आहेत. गेल्या जागतिक स्पर्धेत तर दोघीही दुखापतीमुळे खेळू शकल्या नव्हत्या. त्यामुळे दोघीही कोर्टवर उतरल्या तेव्हा त्यांनी सावध खेळ केला. दोघीही एकमेकींना आजमावत होत्या, चूक कोण करत आहे त्याची प्रतीक्षा करत खेळत होत्या. मात्र त्यात ओकुहाराने अधिक अचूक खेळ करत आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
हे ही वाचा:
वेळ जवळ आली; आता ‘पृथ्वी’ चंद्राभोवती फिरणार!
देवा महाराजा, उद्या फक्त ‘विक्रम’ जल्लोष होऊ दे!
अभिनेते सनी देओल म्हणतात, आता निवडणूक लढणार नाही!
आयटी क्षेत्रात लाखमोलाच्या महिला; १० लाख महिलांना रोजगार
पहिल्या गेममध्ये दोघीही ६-६ बरोबरीत होत्या. पण ओकुहाराने तीन सलग गुण घेतले आणि आघाडी घेतली. त्यानंतर जपानी खेळाडू ओकुहाराने १६-१२ अशी आघाडी घेतली. पण त्यानंतरही सिंधूला परतता आले नाही. ओकुहाराने १९-१२ अशी आघाडी घेत पहिला गेम स्वतःकडे खेचून घेतला.
दुसऱ्या गेममध्ये मात्र सिंधू ९-० अशी आघाडीवर होती. त्यामुळे सिंधू हा गेम घेऊन सामन्यातील चुरस कायम ठेवेल असा अंदाज होता. पण ओकुहाराने हार मानली नाही. तिने सावध खेळ करत सलग पाच गुण घेत १०-९ अशी आघाडी घेतली. मध्यांतराला सिंधूने २ गुणांची आघाडी घेतली. ओकुहाराने प्रयत्न न सोडता १०-१२ अशा पिछाडीवरून सलग सहा गुण घेतले आणि सामना जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकले.