ऑस्ट्रेलियात शीख व्यक्तीच्या गाडीवर ओरखडे, आक्षेपार्ह चित्र

वंशवादातून घडली घटना

ऑस्ट्रेलियात शीख व्यक्तीच्या गाडीवर ओरखडे, आक्षेपार्ह चित्र

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ऑस्ट्रेलियातील शीख व्यक्तीला वांशिक छळाचा सामना करावा लागत आहे. जरनैल सिंग असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या गाडीवर अज्ञातांनी ओरखडे केले असून त्याच्या प्रवासमार्गावर आक्षेपार्ह चित्रे काढली जात आहेत. अज्ञातांनी या व्यक्तीच्या गाडीच्या हँडलवर श्वानाचे मलमूत्र टाकल्याचा दावा केला आहे. तसेच, त्याला ‘घरी जाण्याची’ धमकीही दिली आहे.

 

ऑस्ट्रेलियामधील होबार्ट येथे लोकप्रिय भारतीय रेस्टॉरंट चालवणाऱ्या जरनैल सिंग यांचा गेल्या दोन-तीन महिन्यांपासून असा मानसिक छळ केला जात आहे. सिंग यांना गेल्या काही दिवसांपासून ओळीने त्यांच्या गाडीच्या हँडलवर श्वानाच्या मलमूत्राचा वास येत आहे. त्यानंतर त्यांच्या प्रवासमार्गात ‘भारतीय माणसा, घरी जा’ असेही लिहिण्यात आले होते.

हे ही वाचा:

नूहमध्ये पुन्हा जातीय तणाव; विहिरीचे पूजन करण्यास जाणाऱ्या महिलांवर मदरशातून दगडफेक?

‘ऑपरेशन काली’ अंतर्गत पाच दहशतवाद्यांचा खात्मा

अहमदाबादमधील ‘फायनल’ ठरते आहे महागडी

वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहायला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार

या दोन्ही घटनांबाबत सिंग यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानंतर सिंग यांना वांशिक शिविगाळ असलेली धमकीची पत्रेही मिळू लागली. त्यांनी याबाबतही पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यातही शिविगाळ करून भारतात परत जाण्यास बजावण्यात आले आहे आणि त्याच्या कामाच्या ठिकाणी किंवा घराबाहेर गाडीचे नुकसान करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर सिंग यांची गाडी त्यांच्या कामाच्या ठिकाणी बाहेर उभी असताना गाडीवर ओरखडे मारण्यात आले.

 

‘तुम्हाला तुमच्या घरातही जेव्हा अशा समस्यांचा सामना करावा लागतो, तेव्हा ते मानसिकदृष्ट्या खूप तणावपूर्ण असते आणि विशेषत: तुमच्या नावावर लक्ष्य केले जाते, तेव्हा परिस्थिती अधिकच बिकट असते,’ असे त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. हा प्रकार थांबला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तर, या घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती टास्मानियाच्या पोलिस कमांडरनी दिली. एखाद्या समुदायाचा शाब्दिक किंवा शारिरीक छळ करणाऱ्याला कोणत्याही प्रकारची माफी नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version