27 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरक्राईमनामाशीख नेते रिपुदमन सिंग मलिक यांची कॅनडात गोळ्या झाडून हत्या!

शीख नेते रिपुदमन सिंग मलिक यांची कॅनडात गोळ्या झाडून हत्या!

Google News Follow

Related

शीख नेते आणि आणि उद्योगपती रिपुदमन सिंग मलिक ह्यांची कॅनडा येथील ब्रिटिश कोलंबिया सरे प्रांतात गोळी झाडून गुरुवारी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी हत्या करण्यात आली. रिपुदमन सिंग मलिक ह्यांना १९८५ साली एअर इंडिया (फ्लाइट १८२ कनिष्क) विमानात स्फोट घडवल्या प्रकरणी कॅनडा न्यायालयाने २००५ साली निर्दोष मुक्तता केली.

रिपुदमन सिंग मलिक यांचे मेहुणे जसपाल सिंग यांनी सांगितले की, ही हत्या कुणी केली माहित नाही. संबंधित चौकशीसाठी मलिक ह्यांची धाकटी बहीण कॅनडा येथे जाणार आहे. ‘कनिष्क’ बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे आरोप मलिक ह्यांच्या वर करण्यात आला होता.

हे ही वाचा:

‘मोफत रेवडी वाटून मते गोळा करणारी संस्कृती देशासाठी घातक’

निर्भया पथकाकडून ३०० मुलांची सुखरूप घरवापसी!

भाजपा नेत्यांचा उध्दवना फोन ???

अतिवृष्टीमुळे रद्द झालेल्या परीक्षा होणार; मुंबई विद्यापीठाचा निर्णय

 

काय आहे कनिष्क बॉम्बस्पोर्ट प्रकरण ?

२३ जून १९८५ रोजी कॅनडाहून आयर्लंडच्या किनाऱ्यावर एअर इंडियाच्या फ्लाइट १८२ ‘कनिष्क’ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात एकूण ३२९ प्रवासी व विमानातील कर्मचारी मारले गेले होते. त्यात २८० हूण अधिक कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता. तसेच २९ कुटुंब आणि १२ वर्षाखालील ८६ मुलांचा समावेश होता. मलिक ह्यांचा ‘बब्बर खालसा’ ह्या दहशतवादी संघटनेशी संबंध होता. कनिष्क बॉम्बस्फोट प्रकरणी कथित सूत्रधार तलविंदर सिंग परमार याच्या तो जवळचा सहकारी होता. बब्बर खालसा ही आंतरराष्ट्रीय दहशवादी संघटना असून तिला भारतसह अमेरिका, कॅनडा देशामध्ये बंदी आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा