जम्मू-काश्मीरमध्ये दोन शीख मुलींना पळवून त्यांचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणानंतर आता अकाल तख्त आणि शीख समाजाच्या नेत्यांनी जम्मू-काश्मीरमध्येही धर्मांतरविरोधी कायदा आणण्याची आग्रही मागणी केली आहे.
काश्मीरच्या दोन शीख मुलींना पळवून नेऊन त्यांचे धर्मांतर करण्यात आल्याची घटना मध्यंतरी घडली. नंतर त्यांचा प्रौढ माणसांशी विवाह करण्यात आला. त्यातील एका तरुणीला सोडविण्यात यश मिळाले. तिचा नंतर शीख समाजातील एका तरुणाशी विवाह लावण्यात आला. दुसऱ्या मुलीचा शोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनावर जबरदस्त दबाव वाढला आहे. अकाल तख्त आणि शीख समाजाने जम्मू काश्मीरमध्येही धर्मांतरविरोधी कायदा (लव्ह जिहाद) आणण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेश, हरयाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांत आधीच हा कायदा अमलात आला आहे. अकाल तख्तचे जथ्थेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांनीही नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना पत्र लिहून खोऱ्यात या शीख मुलींचे सक्तीने होणारे धर्मांतर थांबवावे अशी मागणी केली आहे.
हे ही वाचा:
आयपीएल २०२२ मध्ये १० संघ खेळणार
भारतात ‘सबका साथ’वर शिक्कामोर्तब
महिना १०० कोटी खंडणी गोळा करण्याआधी केंद्राला विचारले होते काय?
निर्बंध झुगारत नवी मुंबईत दुकानं उशिरा पर्यंत सुरूच
शीखांच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना यात हस्तक्षेप करण्यास सांगितले. गृह राज्यमंत्र्यांनी आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
ज्या चार शीख महिलांचे धर्मांतर झाले त्यातील एका महिलेने जम्मू-काश्मीर न्यायालयात जाऊन आपले कुटुंबियांपासून रक्षण करावे, अशी मागणी केली आहे. आपण आपल्या इच्छेने धर्मांतर केल्याचे तिचे म्हणणे आहे.