25 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरदेश दुनियाइस्लाम स्वीकारा, नाहीतर देश सोडा... तालिबानचा शीख समुदायाला इशारा!

इस्लाम स्वीकारा, नाहीतर देश सोडा… तालिबानचा शीख समुदायाला इशारा!

Google News Follow

Related

तालिबानने आता अफगाणिस्तानात त्यांच्या धर्मांधतेचे प्रदर्शन करायला सुरुवात केलेली आहे. सत्ता ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने सर्व धर्मांना मान्यता मिळवण्यासाठी सोबत घेतल्याचा दावा केला. पण आता तेथील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची परिस्थिती बिकट होत चालली आहे.

विशेषत: अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या शीख समुदायावर संकट आहे. एका अहवालानुसार, तालिबानने शिखांना सुन्नी मुस्लिम होण्यासाठी किंवा देश सोडून जाण्यासाठी सांगितले जात आहे. इंटरनॅशनल फोरम फॉर राइट्स अँड सिक्युरिटी (IFFRAS) च्या अहवालानुसार, तालिबान सरकारने हे स्पष्ट केले आहे की, शिखांना सुन्नी इस्लाम स्वीकारावा लागेल अन्यथा त्यांना मारले जाईल. तालिबानी सरकार देशातील विविधतेला कधीही प्रोत्साहन देणार नाही.

अशा परिस्थितीत देशात अल्पसंख्यांकांच्या नरसंहाराचा धोका असल्याची भीती अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. तालिबानने १५ ऑगस्ट रोजी काबूलवर ताबा मिळवला होता, त्यानंतर देशात दहशतीचे वातावरण आहे. २६ मार्च २०२० या दिवशी तालिबानने काबूलमधील गुरुद्वारावर गोळीबार केल्यानंतर बहुतेक शीख भारतात रवाना झाले आहेत.

आयएफएफआरएएस ने अहवालात म्हटले आहे की, एकेकाळी अफगाणिस्तानमध्ये हजारो शीख समुदाय राहत होते, परंतु अनेक वर्षांच्या स्थलांतरामुळे आणि हिंसाचारात झालेल्या मृत्यूमुळे अफगाणिस्तानमधील शिखांची संख्या आधीच लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. उरलेले बहुतेक शीख आता काबूलमध्ये राहतात आणि काही गझनी आणि नांगरहारमध्ये राहत आहेत.

 

हे ही वाचा:

ICC Men’s T20 WC: आजपासून रंगणार ‘सुपर १२’ चे धुमशान

होय…आर्यनला ड्रग्स पुरवले! अनन्या पांडेची कबुली

अमित शहा आजपासून काश्मीर दौऱ्यावर

‘अविघ्न पार्क’ अग्नितांडवानंतर पालिकेला जाग; अग्निशमन यंत्रणेचा घेणार आढावा

 

५ ऑक्टोबरला १५ ते २० दहशतवाद्यांनी काबूलमधील कार्ट-ए-परवान जिल्ह्यातील गुरुद्वारामध्ये प्रवेश केला. रक्षकांना ओलीस ठेवले आणि तोडफोडही केली. शीख समुदायाविरोधातील ही पहिली घटना नाही. गेल्या वर्षी जूनमध्ये एका अफगाण शीख नेत्याचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. मार्च २०१९ मध्ये एका शीख व्यक्तीचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर अफगाणिस्तान पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. तर कंदहारमध्ये एका शीखाची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा