कॅटाकौम्बसमध्ये युरोपमधील ममींचा सर्वात मोठा संग्रह आहे. ज्यामध्ये सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत एक हजारहून अधिक ममी केलेले सांगाडे आणि सांगाडे बनलेले मृतदेह आहेत. त्यामध्ये उत्तर सिसीलमध्ये सापडलेल्या लहान मुलांच्या ममीमागचे रहस्य शास्त्रज्ञ उघड करणार आहेत.
या ममी मागचे रहस्य समजण्यासाठी शास्त्रज्ञ एक्स- रे तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत. स्टॅफर्डशायर विद्यापीठातील जैव पुरातत्व विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. कर्स्टी स्क्वायर्स यांच्या नेतृत्वाखाली ही टीम या संग्रहाचे विश्लेषण करणार आहे.
कर्स्टी स्क्वायर्स यांच्यामते, कॅपुचिन कॅटाकॉम्ब्समध्ये जगातील सर्वात महत्त्वाच्या ममींचा समावेश आहे. तथापि, ज्या बालकांचे शवविच्छेदन मंजूर करण्यात आले त्यांच्याबद्दल फारच कमी कागदोपत्री पुरावे आहेत आणि त्या कालावधीतील मृत्यूच्या नोंदींमध्ये मर्यादित माहिती आहे. त्यामुळे १६३ लहान मुलांच्या ममींचे विश्लेषण हे संग्रहाच्या माहितीची तफावत दूर करण्यास मदत करणार आहे.
पालेर्मोचे कॅपुचिन कॅटाकॉम्ब्स हे मठातील भिक्षूंना दफन करण्यासाठी सुरुवातीला बांधलेली थडगी होती. ही थडगी १५९७ मध्ये पूर्ण भरली आणि मुख्य वेदीच्या मागे एक मोठी थडगी तयार करण्यास उत्खनन सुरू झाले. तथापि, जुन्या थडग्यांमधील मृतदेह कुजले नव्हते आणि त्यांचे चेहरेही ओळखता येत होते. कॅपुचिन्सने हे देवाचे कृत्य मानले आणि अवशेष दफन करण्याऐवजी, त्यांनी अवशेष म्हणून मृतदेह प्रदर्शित करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा:
‘बुल्ली बाई’ प्रकरणी नेपाळी नागरिकाने दिले मुंबई पोलिसांना आव्हान
खोक्यात खेकडे असल्याचा बनाव; प्रत्यक्षात निघाली कासवे
ताफा अडविल्याप्रकरणी पंतप्रधानांना काय म्हणाले, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती?
१७८७ पासून कॅटाकॉम्ब्समध्ये बालकांना तिथे दफन करण्याची परवानगी मिळाली होती. ममी केलेल्या प्रौढांवर व्यापक संशोधन केले गेले असले तरी, किशोर ममींकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले गेले आहे. लहान मुलांच्या ममींचे संशोधन करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्या काळातील बाल आरोग्य, त्यांचा विकास, त्यांच्या राहणीमानाची परिस्थिती याबद्दल अधिक माहिती घेणे होय.