बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजिबूर रेहमान यांच्या जीवनावर आधारित आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ‘मुजीब- द मेकिंग ऑफ नेशन’ असे या चित्रपटाचे नाव असून भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशातील सरकारांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दृकश्राव्य सह निर्मिती करारा अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
बंगबंधूच्या शतकमहोत्सवी जयंतीच्या कार्यक्रमात भारत आणि बांगलादेश यांनी शेख मुजीबुर रहमान यांच्या जीवनावरच्या चित्रपटाची घोषणा केली होती. मुजीब यांच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाची सांगता होत असताना, चित्रपटाची निर्मिती पूर्ण होत असल्याने या चित्रपटाचे पोस्टर जारी करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेचे सभासद कार्ड, पैसे उकळले मनसेच्या नावाने?
चिदंबरम म्हणाले, मी प्रियांका गांधींना आधीच सांगितले होते, पण…
२०० जणांच्या जमावाने केला बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर हल्ला
हिजाब वादानंतर फक्त ‘याच’ विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी
प्रसिध्द सिने दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हस्ते या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. श्याम बेनेगल यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शेख मुजीबुर रहमान यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त, एनएफडीसी, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, मुंबई येथे गुरुवार, १७ मार्च २०२२ ला या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण झाले.
या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक श्याम बेनेगल म्हणाले की “शेख मुजीबूर रहमान यांचं उत्तुंग व्यक्तिमत्त्व पडद्यावर आणणे म्हणजे एक अतिशय अवघड कामगिरी होती. ‘मुजीब– द मेकिंग ऑफ अ नेशन’ हा सिनेमा माझ्यासाठी अतिशय भावनिक आहे, बंगबंधूंचे उत्तुंग आयुष्य चित्रपटाच्या रीळात साकारणे अतिशय कठीण काम आहे, आम्ही त्यांचे व्यक्तिमत्त्व कोणतीही तडजोड न करता चित्रित केले आहे. मुजीब भारताचे अतिशय जवळचे मित्र होते. प्रेक्षकांना हे पोस्टर पसंत पडेल अशी मला आशा आहे.”