28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरदेश दुनियासुवर्णविजेत्या नीरज चोप्राला मिळणार ही गाडी

सुवर्णविजेत्या नीरज चोप्राला मिळणार ही गाडी

Google News Follow

Related

भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकवून देत नीरज चोप्राने इतिहास रचला. त्यानंतर आता नीरजचे आयुष्यच बदलून गेलेले आहे. बक्षिसांच्या रकमेनी आता मोठा कोटींचा पल्ला गाठलेला आहे. कौतुकासह बक्षिसांचाही वर्षाव अख्ख्या भारतातून होत आहे. त्याने तब्बल ८७.५८ मीटर लांब भाला फेकत हे सुवर्णपदक मिळवलं.

एथलेटिक्समध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक असल्याने नीरजवर संपूर्ण देशातूंन कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोबतच त्याला कोट्यवधींची बक्षिसंही जाहीर झाली असून यात रोख रकमेसह, गाडी, घर बनवण्यासाठी मोफत सिंमेट, मोफत हवाईयात्रा अशी अनेक बक्षिसं आहेत.

इंडिगो एअरलाईन्सने देखील नीरजला सुवर्णपदक विजयानंतर एक वर्षापर्यंत मोफतमध्ये अनलिमिटेड विमान प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. कंपनीने सांगितलं नीरज ७ ऑगस्ट,२०२२ पर्यंत आमच्या कंपनीच्या विमानाने हवा तितंका मोफत प्रवास करु शकतो. या सर्वासोबतच गुरुग्राम येथील एका रिअल इस्टेट कंपनीने नीरजला २५ लाख रुपये बक्षिस जाहीर केलं आहे. याशिवाय बांगड़ सिमेंट कंपनीने घर बांधण्यासाठी मोफत सिमेंटची घोषणा देखील केली आहे.

हे ही वाचा:

किल्ल्यांच्या संवर्धनापेक्षा महसुलाच्या ‘किल्ल्यां’कडे लक्ष?

महाविकास आघाडीतील सगळेच पक्ष स्वबळावर?

ऑगस्ट क्रांतिदिनी काँग्रेस नेत्याच्या फेसबुकवर ‘कांती’च्या मशाली

व्यवसायिक अविनाश भोसलेंची ही मालमत्ता ईडीकडून जप्त

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना रोख रकमेचे पुरस्कार जाहीर केले. यामध्ये नीरजला एक कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर रौप्य पदक विजेत्यांना ५० लाख आणि कांस्य पदक विजेत्यांना २५ लाख दिले जातील. तर भारतीय हॉकी संघाला १,२५ कोटी रुपये दिले जाणार आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली. चेन्नई सुपर किंग्सने नीरजला एक कोटी रुपये बक्षिसाची घोषणा केली आहे. सीएसके संघ प्रशासनाने दिलेल्या माहिती त्यांनी म्हटलं, ‘नीरज चोप्राने मिळवलेल्या या शानदार यशाबद्दल त्याला एक कोटी रुपये बक्षिस म्हणून चेन्नई सुपरकिंग देणार असून त्याच्यासाठी ८७५८ नंबरची विशेष जर्सी देखील तयार करणार आहे.’

नीरज चोप्राला महिंद्रा ग्रुपतर्फे नुकतीच मार्केटमध्ये आलेली कार XUV700 देण्याची घोषणा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत केली. या सर्वांसह हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. हरियाणा सरकारच्या वतीनं ६ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा