ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात गोळीबार; चार जण ठार

हल्ल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात गोळीबार; चार जण ठार

ऑस्ट्रेलियामधील सिडनी शहरात गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. सिडनी शहरातील एका मॉलमध्ये हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हल्ल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची खळबळ उडाली असून जीव वाचवण्यासाठी लोकांनी घटनास्थळावरून धाव घेतली आहे. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मॉलमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.

सिडनीमध्ये शनिवार, १३ एप्रिल रोजी हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये चाकू हल्ला आणि गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सिडनीच्या बोंडी जंक्शन येथे हा हल्ला झाला. यात चार लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. शनिवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी साधारण ३.४० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर ४ वाजेपर्यंत आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती.

हे ही वाचा:

बंगळूरू कॅफे ब्लास्टमागील आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी

“निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असला तरी नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर पूर्ण झाले नसते”

मांस-मटन खाण्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांकडून ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांची पाठराखण

बंगळूरू कॅफे ब्लास्टच्या मास्टरमाइंडचे वडील होते सैन्यदलात; मुलाच्या कृत्याने दुःखी

सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले की, “ती मॉलच्या वरच्या मजल्यावरील फूड कोर्टमध्ये जेवण करत होती तेव्हा तिने लोकांना धावत जाताना आणि ओरडताना पाहिले. हल्लेखोराने हुडी घातला होता आणि तो लोकांचा पाठलाग करत चाकूचा धाक दाखवत होता.” आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “मॉलमधील सुपरमार्केटमध्ये प्रवेश करत असताना एका व्यक्तीला तिने खिशातून चाकू बाहेर काढताना आणि नंतर आवारात गोळीबार करताना पाहिले.” सिडनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांचा उद्देश दुकानदारांना टार्गेट करण्याचा होता.

Exit mobile version