आता भारताला भारतीयांच्या बुटांचा आकार ब्रिटन किंवा अमेरिका यांच्या मोजमापाप्रमाणे न मोजता, आता भारत स्वतःची मोजमाप प्रणाली विकसित करणार आहे.
उद्योग आणि अंतर्गत व्यापाराच्या संवर्धनासाठी विभागाने (DPIIT) चेन्नई मध्ये असलेले सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट (CLRI) सोबत सल्लामसलत करून “भारतीय- पादत्राणे मोजमाप प्रणाली” विकसित करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या भारतीय बाजापेठेत आकार आणि फिटींगसाठी युरोपियन आणि यूएस मानकांचा वापर केला जातो. पण हे भारतीय पायांची वैशिष्ट्ये अचूकपणे ओळखत नाही. म्हणून आता स्थानिक लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी आवश्यक असलेल्या पादत्राणांच्या आकाराची श्रेणी विकसित करणार आहेत.
सुमारे ११ कोटी रुपयांच्या प्रारंभिक वाटपाचा समावेश असलेली ही प्रक्रिया योग्य आणि आरोग्यदायी पादत्राणे प्रदान करण्यासाठी आवश्यक असलेले बूट बनवण्याचे प्रमाण करणार असल्याचे, असे एका निवेदनात म्हटले आहे. सध्या, भारतात पादत्रांणांचा आकार आणि मोजमाप हे युरोपियन आणि फ्रेंच प्रणाली वर आधारित आहे. पण आता भारत स्वतः ची प्रणाली तयार करणार आहे. या प्रणालीमध्ये लोकांच्या पायांच्या लोकसंख्याशास्त्रीय, मानववंशीय वैशिष्ट्यही सामावून घेणार आहेत. ज्यामुळे अधिक आरामदायक पादत्राणे तयार केली जातील आणि व्यक्तीचे आरोग्य चांगले राहील.
हे ही वाचा:
मुंबईत १४४ ‘कलम’; एमआयएमच्या सभेला गर्दी
सौदी अरबमध्ये तब्लिघी जमातवर बंदी
ऋतुराजला आला बहर, झळकाविले तिसरे शतक
‘पर्यावरण मंत्र्यांची समुद्र किनाऱ्यासाठी काम करण्याची इच्छा दिसत नाही’
काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारचा उपक्रम कपड्यांसाठी साठी सुरू केला होता. अजुनही ही प्रक्रिया अपूर्ण आहे. डीपीआयआयटीने सांगितले की, फुटवेअर प्रकल्पामध्ये पाय बायोमेकॅनिक्स आणि गेट स्टडी मटेरियल आयडेंटिफिकेशन, लॅस्ट फॅब्रिकेशन, पॅटर्न आणि कम्फर्ट पॅरामीटर्सचा विकास, वेअर ट्रायल आणि स्पेसिफिकेशन तयार करणे यांचा समावेश असेल.