देशाच्या आजच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे राजपथावरील देशाच्या शक्ती आणि संस्कृतीची भव्य परेड आयोजित करण्यात आली होती. यावेळी हवाई दलाच्या चित्ररथाने विशेष लक्ष वेधून घेतले. राफेल लढाऊ विमान चालवणाऱ्या देशातील पहिली महिला फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंग, भारतीय हवाई दलाच्या चित्ररथावर उपस्थित होत्या.
जेव्हा हवाई दलाचा वाद्यवृंद आणि कवायत करणारी तुकडी यांचे राजपथावरून मार्गक्रमण झाले. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंग यांच्याकडे हवाई दलाच्या चित्ररथाचे नेतृत्व होते. जगातील सर्वोत्तम श्रेणीच्या लढाऊ विमानांपैंकी एक असलेल्या ‘राफेल’ची पहिली महिला फायटर पायलट बनण्याचा मान शिवांगी सिंग यांना मिळाला आहे. राफेल वायुसेनेतील ‘मिग 21 बायसन’ची जागा घेताच शिवांगीही आपल्या नव्या भूमिकेत दाखल झाल्या आहेत.
शिवांगी सिंग यांना लढाऊ वैमानिक बनण्याची प्रेरणा आपल्या आजोबांकडून मिळाली, जे सैन्यात कर्नल होते. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंग आधी राजस्थानच्या फॉरवर्ड फायटरमध्ये तैनात होत्या, जिथे त्यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासह उड्डाण केले होते.
हे ही वाचा:
युवराजच्या घरी आला आणखी एक ‘युवराज’
पद्म पुरस्कार देताना बुद्धदेव भट्टाचार्य यांना विचारले नसावे!
कोण आहेत शिवांगी सिंग?
शिवांगी ह्या राफेल लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. देशातील सर्वात शक्तिशाली राफेल विमान उडवण्याची जबाबदारी फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंग यांना मिळाली आहे. शिवांगी सिंह या उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील मूळ रहिवासी आहेत. शिवांगी यांनी बनारस हिंदू यूनिव्हर्सिटीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. शिवांगी या बीएचयूमध्ये नॅशनल कॅडेट कोरमध्ये ७ एअर स्क्वाड्रनचा भाग होत्या. बीएचयूमध्ये २०१३ ते २०१५ पर्यंत त्या एनसीसी कॅडेट होत्या. २०१३ मध्ये त्यांनी दिल्लीत स्वातंत्र्यदिनी परेडमध्ये उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व केले होते.