भारताच्या एलओसीवर विराजमान होणार छत्रपती शिवाजी महाराज

भूमिपूजनासाठी नेणार महाराजांच्या किल्ल्यावरील माती

भारताच्या एलओसीवर विराजमान होणार छत्रपती शिवाजी महाराज

शिवजयंतीच्या निमित्ताने जम्मू काश्मीरमध्ये भारत पाक सीमेवर टिटवाल आणि करनाह सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ छत्रपतिंच पुतळा बसवण्यात येणार आहे. पुढील महिन्यात या दोन पुतळ्यांचे उभारणीचे काम सुरु होणार असून त्यासाठी आम्ही पुणेकर ही पुण्याची स्वयंसेवी संस्था खास भूमिपूजनासाठी महाराजांच्या किल्ल्यावरील माती घेणार असल्याची माहिती मिळत आहे. १४ फेब्रुवारी रोजी आम्ही पुणेकर या स्वयंसेवी संस्थेने भारत पाकच्या नियंत्रण रेषेवर अर्थात  एलओसी वर छत्रपतिंच   पुतळा बसवणार असल्याची घोषणा केली आहे. हा पुतळा बसवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे छत्रपतींचे शौर्य शत्रूंविरुद्ध लढणाऱ्या सैनिकांना त्यांचा आदर्श आणि नैतिक मूल्यांची प्रेरणा मिळणे हा आहे.

कुपवाडा प्रशासनास मान्य

‘आम्ही पुणेकर’ या स्वयंसेवी संस्था आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज अटकेपार स्मारक समितीचे’ प्रमुख अभयराज शिरोळे यांच्या सहकार्याने हा पुतळा कुपवाड मध्ये बसवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात कुपवाडा जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घेतल्याचे सांगण्यात आले. तर पुतळ्याच्या उभारणीचे भूमिपूजन मार्च महिना अखेर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. छत्रपतींच्या पदकमल्लांनी पावन झालेल्या रायगड , राजगड, प्रतापगड, तोरणा, शिवनेरी या सर्व किल्ल्यावरील माती खास भूमिपूजनासाठी काश्मीरमध्ये आणली जाणार आहे.काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर किरण आणि तंगधर या दोन ठिकाणी महाराजांचे पुतळे बसवले जाणार आहेत.

हे ही वाचा:

अधिक युक्तिवादाची गरज .. सत्तासंघर्षांवर आता २१ फेब्रुवारीला सुनावणी

गिरीश बापट यांच्यामुळे कसब्याचा गड मजबूत

राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पणदिनानिमित्त विशेष कार्यक्रम

मेघालय नंतर आता काश्मीरला भूकंपाचे धक्के

२०२२ च्या जानेवारीमध्ये मराठा रेजिमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन पुतळे जम्मू काश्मीरमध्ये स्थापन केले होते त्यातील एक पुतळा समुद्रसपाटीपासून १४८०० फूट उंचीवर नियंत्रण रेषेजवळ बसवण्यात आला असून आता आणखी दोन पुतळे हि संस्था बांधणार आहे.  या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक हेमंत जाधव म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अचूक रणनीतीने आणि मोठ्या ध्येर्याने शत्रूं   हुसकावण्यात यश आले. महाराजांचे गनिमी तंत्र जगभरात प्रसिद्धच आहे. ते वेळोवेळी सगळेच अवलंबतात. महाराजांच्या पुतळ्यामुळे आपल्या सीमेवरील जवानांना प्रेरणा प्रमुख उद्देश हे पुतळे बसवण्यासाठी आहे. म्हणूनच भारत पाक सीमेवर महाराजांचे हे पुतळे बसवण्यात येणार आहेत.

Exit mobile version